बारा आमदारांच्या निलंबनानंतर भाजपला दुसरा दणका : विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या हालचाली - Second blow to BJP after suspension of 12 MLAs as Movements for Assembly Speaker election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

बारा आमदारांच्या निलंबनानंतर भाजपला दुसरा दणका : विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या हालचाली

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

महाविकास आघाडीसाठी अनुकूल स्थिती... 

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना (12 MLAs of BJP susupended) विधानसभेतून वर्षभरासाठी निलंबित केल्यानंतर वेगळ्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी झाल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चोवीस तासांच्या आत नोटीस देऊन ही निवडणूक घेता येत असल्याने त्यासाठी महाआघाडी सरकारमधील चाणक्य आता कामाला लागले आहेत. (Monsoon session of Maharashtra Assembly) 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हीप लागू होत नाही. तसेच मतदानही गोपनीय पद्धतीने होते. त्यामुळे ही निवडणूक घेताना महाविकास आघाडीच्या मनात धाकधूक होती. अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका ठरविताना ही निवडणूक घेण्याचे नियोजन नव्हते. मात्र आता विधानसभेतील भाजपचे बळ हे 106 वरून बाराने कमी झाली आहे. या निलंबनानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे  साहजिकच महाविकास आघाडीसाठी ही परिस्थिती अनुकूल असल्याचे मानले जात आहे.

वाचा या बातम्या : आमदार सरनाईक विधानसभेत अवतरले आणि म्हणाले

सरकार जागे होण्यासाठी आणखी किती स्वप्नील हवेत?

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस व जाधव यांच्यात चकमक

भास्कर जाधवांना शिवीगाळ; भाजपचे बारा आमदार निलंबित

गिरीश महाजन डायसवर, संजय कुटेंनी माईक खेचला

ओबीसींच्या मुद्यांवरून गाजली विधान परिषद

काॅंग्रेस या निवडणुकीसाठी आग्रही आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीतील नेत्यांची बैठक झाली. काॅंग्रेस जे नाव देईल, ते मंजूर करण्याचे ठरले आहे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर यांच्या नावाची चर्चा आहे. अजून काॅंग्रेसने आपले नाव निश्चित केलेले नाही. पण सध्याची सभागृहातील परिस्थिती पाहता काॅंग्रेसही वेगाने हालचाल करून पक्षश्रेष्ठींकडून नावास संमती आणेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

पक्षनिहाय आमदारांची संख्या 

 • शिवसेना- 56
 • राष्ट्रवादी काॅंग्रेस- 53
 • काॅंग्रेस- 43
 • भाजप-106
 • बहुजन विकास आघाडी-3
 • समाजवादी पक्ष-2
 • एमआयएम-2
 • प्रहार जनशक्ती-2
 • मनसे-1
 • सीपीएम-1
 • शेकाप-1
 • स्वाभिमानी -1
 • रासप-1
 • जनसुराज्य-1
 • क्रांतिकारी शेतकरी पक्ष-1
 • अपक्ष-13
 • रिक्त 1
 • (विधीमंडळाच्या वेबसाईटवरून)

महाविकास आघाडी सरकारने आपला विश्वासदर्शक ठराव हा 172 मते मिळवून मंजूर करून घेतला होता. त्यामुळे `मॅजिक फिगर`145 पेक्षा अधिक मते महाविकास आघाडीकडे सध्या तरी आहेत. काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मिळूनच संख्या ही 152 होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बहुमताबाबत निश्चिंत आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख