आमदार प्रताप सरनाईक थेट विधिमंडळात अवतरले अन् म्हणाले... - shiv sena mla pratap sarnaik attends maharashtra assembly session | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आमदार प्रताप सरनाईक थेट विधिमंडळात अवतरले अन् म्हणाले...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 जुलै 2021

शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक विधिमंडळात अवतरले. 

मुंबई : शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली होती. आज सरनाईक थेट विधिमंडळात (Assembly Session) हजर झाले. देशात माझ्याविरुद्ध एकही एफआयआर दाखल झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. 

विधिमंडळात आल्यानंतर सरनाईक म्हणाले की, आज अधिवेशन असून, प्रतोंदांनी व्हीप बजावला असल्याने त्याचे पालन करायला मी आलो आहे. देशात कुठेही माझ्यावर गुन्हा दाखल नाही. तसेच, लेखी स्वरूपात आरोप आणि जबाबही दाखल नाही. एमएमआरडीए बाबत माझ्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांची तपासणी केली जात आहे. माझ्यावर झालेली हृदय शस्त्रक्रिया झाली असून, माझी पत्नीही कर्करोगाने आजारी होती. त्यामुळे मी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय  घेतला होता, असे सरनाईक यांनी सांगितले. 

हेही वाचा : आज तुमची खूप आठवण येतेय! मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक 

मी ८४ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो आहे. भाजप- शिवसेना युती तुटायच्या आधी मी अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केली होती. कौटुंबिक कारणामुळे मला बाहेर पडता येत नव्हते. परंतु, मी काम करत होतो. महाविकास आघाडीतील नेत्यांनी तेव्हा मला हवा तसा पाठिंबा दिला नाही, म्हणून मी ते पत्र पाठवले होते, परंतु, तो विषय आता संपला आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. 

अनव्य नाईक प्रकरणात मी आवाज उठवला, कंगना राणावत पोलिसांबद्दल बोलत होती म्हणून तिच्याविरोधात हक्कभंग आणला. महाराष्ट्राविषयी, पोलिसांविषयी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी सतत लढत होतो. त्यामुळे मी विरोधकांचे लक्ष्य ठरलो आहे. माझ्यावर काहीच तक्रार नसताना मला चौकशीत अडकवले जात आहे. 

आमदार सरनाईक यांनी एक पत्र मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्याचा कसा प्रयत्न करत आहेत, सरकारमधील मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा शिवसेनेच्या मागे कसा लावत आहेत? याचा उल्लेख होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी जुळवून घेण्याची विनंतीही या पत्रात करण्यात आली होती. या पत्राने शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख