अधिवेशनाच्या पहिल्याच १० मिनिटात मुनगंटीवार आणि भास्कर जाधव यांच्यात चकमक - Clashes between Mungantiwar and Bhaskar Jadhav in the first 10 minutes of the convention | Politics Marathi News - Sarkarnama

अधिवेशनाच्या पहिल्याच १० मिनिटात मुनगंटीवार आणि भास्कर जाधव यांच्यात चकमक

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

मुनगंटीवार यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही आक्षेप घेतला

मुंबई : विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (Assembly Session) आजपासून सुरु झाले आहे. सभागृहात कामकाजाची सुरुवात होताच, तारांकीत प्रश्न वगळल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले. त्यांनी एका माजी मंत्र्याचे नाव घेतल्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. (Clashes between Mungantiwar and Bhaskar Jadhav in the first 10 minutes of the convention) 

या मुद्यांवर अधिवेशनात होणार खडाजंगी

मुनगंटीवार बोलत असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव हे मध्ये बोलले. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, तुम्ही मध्ये बोलू नका, एक माजी मंत्री असेच मध्ये बोलले होते. त्यामुळे त्यांना जावे लागले. तुम्ही मध्ये बोलत आहात. तुम्हालाही जावे लागेल. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरकत घेतली. मुनगंटीवार हे सभागृहात सदस्यांना धमकी देत असल्याचे म्हटले. मुनगंटीवार यांचे वाक्य कामकाजातून वगळून टाकण्याची विनंती अध्यक्षांना केली. 

तर रामदास आठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते!

मुनगंटीवार यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही आक्षेप घेतला, मुनगंटीवार यांचे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यामुळे कामकाज सुरु होतात, सभागृहात गोंधळ झाला. या नंतर भास्कर जाधव म्हणाले, मुनगंटीवार यांचे शब्द कामकाजातून न वगळता तसेच ठेवा आणि माझे रक्षण करा. कारण महाराष्ट्रात सध्या हेच सुरु आहे. जे कोणी यांच्या विषयी बोलले, त्यांच्यामागे सीबीआय, ईडी लावली जात आहे. त्यानंतर अध्यक्षांनी मुनगंटीवार यांचे वाक्य कामकाजातून काढून टाकत असल्याचे सांगितले.   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख