निलंबित आरटीओ गजेंद्र पाटील जबाब देताना अस्वस्थ...पोलिसांनीही पाळली कमालीची गोपनीयता!

प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) गैरव्यवहाराच्या आरोपावरून चर्चेत आलेले निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांचा सोमवारी पोलिस आयुक्तालयात जबाब नोंदविण्याचे काम सुरु झाला. जबाब घेताल असतानाच दुपारी त्याची प्रकृती बिघडली. आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचा दावा त्याने केला.
anil parab
anil parab

नाशिक : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या काळात प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) गैरव्यवहाराच्या आरोपावरून चर्चेत आलेले निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील (police record RTO Inspector Gajendra patil`s statement) यांचा सोमवारी पोलिस आयुक्तालयात जबाब नोंदविण्याचे काम सुरु झाला. जबाब घेताल असतानाच दुपारी त्याची प्रकृती बिघडली. (He find himself not comfortable in Afternoon) आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे आज देखील त्याला बोलावण्यात आले. आज अत्यंत कडेकोट बंदोबस्तात त्याचा जबाब नोंदविण्यात आला. पोलिसांनी याबाबत अतिशय गोपनियता बाळगल्याने (Police maintained secracy in This case) श्री. पाटील याने जबाबात काय सांगितले हे समजू शकले नाही. 

निलंबित व तक्रार केलेला आरटीओ गजेंद्र पाटील सोमवारी पोलिस आयुक्तांपुढे हजर झाले. उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाब घेतला. यावेळी त्यांनी इमेल मध्ये दिलेल्या विविध मुद्दे व त्यातील काय प्रमाण त्यांच्याकडे आहेत. याची विचारणा करण्यात आल्याचे कळते. मात्र वकिलासह आलेल्या गजेंद्र पाटील यांनी त्यासंदर्भात सर्व तक्रारींची कागदपत्र व पुरावे आपल्याकडे नाहीत. त्यांनी आरटीओ कार्यलय व विभागाचे विविध कार्यालयीन आदेश सादर केल्याचे कळते. त्यामुळे या प्रकरणात त्याचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला.

जबाब नोंदविण्याचे काम सुरु असतानाच दुपारी श्री. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. श्री. पाटील यांच्या जबाबाच्या अनुषंगाने आज राज्याचे परिवहन विभागाचे सहसचिव प्रकाश साबळे यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती श्री. बारकुंड यांनी दिली.

पाटील यांच्या चौकशीमुळे पोलिस आयुक्तालयात कडेकोट बंदोबस्त होता. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या प्रकरणाचा तपास बारकुंड यांच्याकडे सोपविला आहे. त्यानुसार पोलिसांनी पाटील यांनी नाव घेतलेल्या सगळ्या आधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. आतापर्यंत बारा आधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे. त्यात, नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी भरत कळसकर, बजरंग खरमाटे (नागपूर), श्री. लोही (जळगाव), नाना बच्छाव (धुळे- नंदुरबार), हेमंत घोरपडे आदींचा समावेश आहे. जबाब नोंदणीचे काम सुरु असताना पत्रकारांना कार्यालयात प्रेवश करण्यास मनाई करण्यात आली. तपासात काय झाले या माहितीसाठी देखील रात्री आठनंतर संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे या हाय प्रोफाईल प्रकरणाची चौकशी अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com