अनिल परब यांच्यावर गैरव्यवहाराचा मेल करून गजेंद्र पाटील गायब का झाला?

प्रादेशिक परिवहन विभागात कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप नाशिकमधील मोटार वाहन निरीक्षकाने केला आहे.
Anil Parab
Anil Parab

नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागात कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप नाशिकमधील मोटार वाहन निरीक्षकाने केला आहे. (RTO Inspecotr blaim crores of corruption in transfer case)  त्यात, या अधिकाऱ्याने पंचवटी पोलिसांकडे ई मेलसह तक्रार करीत त्यात, परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab)  यांच्यासह प्रादेशिक परिवहन आधिकाऱ्यांचे नाव घेतल्याने प्रकरण चांगलाच गोंधळ उडवून दिला. त्यामुळे सध्याचे राजकीय वतावरण पाहता स्वतः परिवहन मंत्री  केले अनिल परब यांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी हे आरोप फेटाळले.

संबधित अधिकारी स्वतःच प्रचंड वादग्रस्त आहे. तो लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे निलंबीत झालेला आहे. हा तक्रारीचा ईमेल केल्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याची भ्रमणध्वनी  बंद आहे. त्यामुळे यामागे कळीचा नारद नेमका कोण? याची चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ देखील परब यांच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी याबाबत जिल्हा रुग्णालयातील प्राणवायूच्या पुरवठा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की आरोप करणारे गजेंद्र पाटील धुळे येथे असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. सध्या ते नाशिक 'आरटीओ'त मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी पंचवटी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या राज्यभरातील विविध कार्यालयांतील अधिकारी चेकपोस्ट, बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करतात. अधिकारी लाखो रुपये वसूल करून वरपर्यंत पाठवतात. हा आकडा दिडशे ते दोनशे कोटींपर्यंत असून, परिवहनमंत्री अनिल परब, राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उपपरिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, परिवहन विभागाचे अवर सचिव डी. एच. कदम, वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची नावे घेतली आहे.

तक्रारदाराकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसून मोबाइल बंद असून, निवासस्थानाचा पत्ताही नसल्याचे सांगत हा विषय पोलिस आयुक्तांकडे पाठविला आहे. तर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी तक्रारदार सहकार्य करत नाही, म्हणून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगत हे प्रकरण गुन्हे शोध विभागाचे उपायुक्त संजय बारकुंड यांच्याकडे सोपवित पाच दिवसांत चौकशी अहवाल मागविला आहे.

आरोप निराधार
दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विट करीत आरोप फेटाळले. निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुध्द तसेच परिवहन आयुक्तांसह इतर पाच आधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलिसात दिलेली तक्रार पूर्ण निराधार व खोटी असल्याचे ट्विट केले आहे. निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर ५  अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, असा दावा परब यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com