किरीट सोमय्यांचं भाकित; अनिल परब केवळ दोन महिन्यांचे पाहूणे

सोमय्या यांच्याकडून सातत्याने परब यांना लक्ष्य केले जात आहे.
Anil Parab's various cases are under investigation says Kirit Somaiya
Anil Parab's various cases are under investigation says Kirit Somaiya

बदलापूर : मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॅाम्बनंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चौकशी CBI कडून सुरू आहे. या प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज त्याचा पुनर्उच्चार करत अनिल परब आता केवळ दोन महिन्यांचे पाहूणे असल्याचा दावा केला आहे. (Anil Parab's various cases are under investigation says Kirit Somaiya)

बदलापूर येथे माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी हे वक्तव्य केलं आहे. सोमैय्या यांच्याकडून सातत्याने परब यांना लक्ष्य केले जात आहे. ते म्हणाले, ठाकरे सरकार कोरोना काळात केवळ भ्रष्टाचार करत आहे. आता अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा क्रमांक आहे. त्यांच्यावर अनेक प्रकरणांत घोटाळा केल्याचे आरोप आहेत. राज्यपालांनीही त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. विविध यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे. त्यामुळं ते केवळ दोन महिन्यांचे पाहूणे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. 

सोमय्या यांनी काल माध्यमांशी बोलताना आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला होता. सचिन वाझे याच्यासोबत पाच ऑफिसर निलंबित झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली आहे, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह घरी गेले आहे. आता पुढचा नंबर गृहमंत्री अनिल परब यांचा लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे.जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी करणारं आहे, असंही किरीट सोमय्या या वेळी म्हणाले. 

दरम्यान, शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक हे फरारी आहेत. संजय राऊत यांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत, हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे लाईनीत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनाही डिवचलं आहे.

परिवहन विभागात परब हे त्यांच्या पीएमार्फत मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत. बदल्यांमध्ये पैसे घेतले जात आहेत, अशा प्रकारचे आरोप निलंबित आरटीओ निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी नाशिक पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com