वाझे, देशमुख गेले; आता अनिल परब आणि जितेंद्र आव्हाडांचा नंबर - Waze, Deshmukh gone; Now Anil Parab and Jitendra Awhad's number : Kirit Somaiya | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

वाझे, देशमुख गेले; आता अनिल परब आणि जितेंद्र आव्हाडांचा नंबर

विश्वभूषण लिमये
शनिवार, 29 मे 2021

हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकावं.

सोलापूर :  सचिन वाझे याच्यासोबत पाच ऑफिसर निलंबित झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली आहे, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह घरी गेले आहे. आता पुढचा नंबर गृहमंत्री अनिल परब यांचा लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे, असा खळबळजनक दावा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी सोलापुरात केला आहे. (Waze, Deshmukh gone; Now Anil Parab and Jitendra Awhad's number : Kirit Somaiya)

माजी खासदार किरीट सोमय्या हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी वरील दावा केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या कोविड करप्शनला भारतीय जनता पक्ष विरोध करत आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकावं. मात्र, जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी करणारं आहे, असंही किरीट सोमय्या या वेळी म्हणाले. 

हेही वाचा :  चंद्रकांत पाटील झोपेत बोलले की जागे असताना? : अजित पवारांनी उडवली खिल्ली 

दरम्यान, शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक हे फरारी आहेत. संजय राऊत यांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत, हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे लाईनीत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनाही डिवचलं आहे.

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा एवढा घमंड करू नये. जालन्यात भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांस पाच पोलिसांकडून जी मारहाण झाली आहे, ती अत्यंत निंदनीय आहे. त्या प्रकरणातील चार पोलिस निलंबित झाले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी व्हायला हवी, अशी भाजपची मागणी आहे, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख