डॉ. अभिनव देशमुखांचा शिरुर पोलिसांना दणका

सततच्या त्रासाला कंटाळलेल्या वाळू व्यावसायिकांनीही पुराव्यांसह तक्रारी केल्याने ही कारवाई केली.
Sarkarnama Banner - 2021-07-31T115016.996.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-31T115016.996.jpg

शिरूर  : अवैध धंदे व विशेषतः बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई न करता त्यांच्याकडूनच पैशांची वसुली केल्याप्रकरणी शिरूर पोलिस Shirur Police ठाण्यातील एका पोलिसाला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख Dr. Abhinav Deshmukh यांनी निलंबित केले आहे.

दोघा पोलिसांची तडकाफडकी मुख्यालयात बदली केली आहे.  इब्राहिम गनी शेख, असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे.  बदली केलेल्या पोलिसांची नावे जाहीर केलेली नाहीत.

शेख यांच्यावर शिस्तभंगाचा व गैरवर्तनाचा ठपका ठेवत जिल्हा अधीक्षकांनी त्यांना निलंबित केले. शेखसह इतर दोन पोलिस हे रात्रीच्या वेळी अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवून त्यांना रस्त्यात गाठून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत गेल्या होत्या. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या काही वाळू व्यावसायिकांनीही थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पुराव्यांसह तक्रारी केल्याने ही कठोर कारवाई केली.

शिरुरचे पुढचे खासदार पुन्हा आढळरावच : रवींद्र मिर्लेकर
पिंपरी : सलग तीन वेळा शिरूरमधून (जि. पुणे) खासदार म्हणून निवडून येणा-या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात कोण तरी नाटकवाला उभा राहतो आणि निवडून येतो. आढळरावांचा हा पराभव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे उद्याचे शिरुरचे खासदार आढळराव असतील यासाठी यासाठी मी स्व:ता लक्ष घालणार आहे, असे शिवसेना उपनेते व विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये सांगितले.

तेजस्वी यादव-नितीश कुमार यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय?
पाटना : बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणाची चर्चा रंगत आहे. जातीय जनगणनेच्या मुद्दयावर बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव Tejashwi Yadav यांनी काल मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली.  तेजस्वी यादव व मुख्यमंत्री नितीश कुमार Nitish Kumar यांच्या भेटीवरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत. तेजस्वी यादव यांनी या भेटीनंतर सांगितले, की यासंदर्भात दोन ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com