गणपतराव आबांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

सांगोला सूतगिरणी परिसरात सकाळपासून गणपतराव आबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.
2Ganpatrao_20Deshmukh_20ff.jpeg
2Ganpatrao_20Deshmukh_20ff.jpeg

सोलापूर : महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय 96) (Ganpatrao Deshmukh) यांचे काल वृद्धपकाळाने निधन झाले. सोलापूरमध्ये एका खासगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पित्ताशयाची शस्त्रक्रिया ही पडली पार पडली. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सांगोल्यातील शेतकरी सहकारी सूतगिरणी परिसरात आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. 

त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला (Sangola) मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. देशमुख यांच्या निधनामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सांगोला सूतगिरणी परिसरात आज सकाळपासून गणपत आबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.

शेतकरी कामगार पक्षाकडून (PWP) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तब्बल 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. आबासाहेब या नावाने ते परिचित होते. त्यांचा जन्म 10 आॅगस्ट 1926 रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रात विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.  

कर्नाटक मंत्रीमंडळ विस्तारात आता पाच उपमुख्यमंत्री   
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलेले नेते म्हणून त्यांचा लौकीक होता.  गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. त्यांनी पहिल्यांदा 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांचा केवळ दोनदाच पराभव झाला. 1972 आणि 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते सलग आमदार राहिले.  1972 च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी ते त्यानंतर झालेल्या 1974 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना लागला तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1977 साली गणपत आबांनी महाराष्ट्र विधानसभेच 'विरोधीपक्ष नेते' पद सांभाळले होते. त्यानंतर 1978 मध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. एसटी बसने प्रवास आणि साधी राहणी यामुळे ते लोकप्रिय होते. 
 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com