तेजस्वी यादव-नितीश कुमार यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय?

तेजस्वी यादव व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीवरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत.
तेजस्वी यादव-नितीश कुमार यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय?
Sarkarnama Banner - 2021-07-31T103607.939.jpg

पाटना : बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणाची चर्चा रंगत आहे. जातीय जनगणनेच्या मुद्दयावर बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव Tejashwi Yadav यांनी काल मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली.  तेजस्वी यादव व मुख्यमंत्री नितीश कुमार Nitish Kumar यांच्या भेटीवरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत. तेजस्वी यादव यांनी या भेटीनंतर सांगितले, की यासंदर्भात दोन ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार आहे.

बिहार विधानसभेने जातीय जनगणनेचा प्रस्ताव दोनवेळा पारित करून केंद्र सरकारला पाठविल्याची माहिती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतीच दिली. जातीय जनगणनेमुळे विकास योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतील, असेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आरसीपी सिंह यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने संयुक्त जनता दल नवीन अध्यक्षाच्या शोधात आहे.
कर्नाटक मंत्रीमंडळ विस्तारात आता पाच उपमुख्यमंत्री  
 जातीय जनगणनेसाठी तेजस्वी यादव व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीवरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत. बिहारमध्ये २०२५ नंतर भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा, असे वक्तव्य राज्याच्या मंत्रिमंडळात नुकतेच भाजपच्या कोट्यातून समावेश झालेले मंत्री सम्राट चौधरी यांनी केले होते. संयुक्त जनता दलात या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली. नितीशकुमार हेच ‘एनडीए’चा बिहारमधील विश्वासार्ह चेहरा असल्याचा दावाही पक्षाने केला होता. या भेटीमुळे जातीय जनगणना करण्यावर या दोन्ही नेत्यांचे एकमत असल्याचे समोर आले आहे. 
शिवसेनेचा गृहमंत्र्यांचा सल्ला 'वेळीच पावले उचला'
मुंबई : आसाम आणि मिझोराम मध्ये सध्या सुरू असलेल्या वादावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून टीका केली आहे. दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. हिंदुस्थान-पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले. अमित शहा (Amit Shaha) यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम (Asam Mizoram) या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा,अश अपेक्षा अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
 Edited by : Mangesh Mahale 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in