शिरुरचे पुढचे खासदार पुन्हा आढळरावच : रवींद्र मिर्लेकर

सामाजिक उपक्रमांचे उत्तम आयोजन करणा-या नागरिकांच्या मदतीला धावून जाणा-यांना जनता विसरणार नाही. अशा शिवसैनिकांच्या मागे पक्ष निश्चित उभा राहिल, या शब्दांत त्यांनी संतोष वाळकेंचे कौतूक केले.
शिरुरचे पुढचे खासदार पुन्हा आढळरावच : रवींद्र मिर्लेकर
Shirur's next MP Adhalrao : Ravindra Mirlekar

पिंपरी : सलग तीन वेळा शिरूरमधून (जि. पुणे) खासदार म्हणून निवडून येणा-या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात कोण तरी नाटकवाला उभा राहतो आणि निवडून येतो. आढळरावांचा हा पराभव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे उद्याचे शिरुरचे खासदार आढळराव असतील यासाठी यासाठी मी स्व:ता लक्ष घालणार आहे, असे शिवसेना उपनेते व विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये सांगितले. Shirur's next MP Shivajirao Adhalrao : Ravindra Mirlekar

मात्र, त्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. मी पुन्हा येईन अशी दर्पोक्ती करणा-यांना मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आडवे केले आहे, या शब्दांत त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. भविष्यात अशाप्रकारची अनेक आव्हाने मुख्यमंत्री पेलणार आहेत. कारण, गल्ली बोळातील शिवसैनिक ही शिवसेनेची ताकत आहे, असेही मिर्लेकर म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक संतोष वाळके, शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठानच्या वतीने दिघी येथे गुरुवारी (ता.२९) आयोजित महायज्ञ रक्तदान शिबीरातील पाच लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षिसे देताना मिर्लेकर बोलत होते. एलसीडी टिव्ही, फ्रीज, मिक्सर, टेबल फॅन, ओव्हन बक्षिस म्हणून देण्यात आले. तर, प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट, दहा लिटर पाण्याचा जार किंवा स्पिकर फोन यापैकी एक वस्तू भेट देण्यात आली.

शिवसेना उपनेते व माजी खासदार आढळराव, आयोजक संतोष वाळके, कामगार नेते इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा संघटक आबा लांडगे, खेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख अशोक खांडेभराड आदी यावेळी उपस्थित होते. भोसरी मतदारसंघात एकही शिवसेनेचा नगरसेवक नसल्याबद्दल आढळरावांनी यावेळी खंत व्यक्त केली.

तरी देखील येथील शिवसैनिक झपाटून कामाला लागल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. सामाजिक उपक्रमांचे उत्तम आयोजन करणा-या नागरिकांच्या मदतीला धावून जाणा-यांना जनता विसरणार नाही. अशा शिवसैनिकांच्या मागे पक्ष निश्चित उभा राहिल, या शब्दांत त्यांनी संतोष वाळकेंचे कौतूक केले. कृष्णा वाळके यांनी प्रास्ताविक तर संतोष वाळके यांनी स्वागत केले. अक्षय मोरे यांनी सुत्रसंचालन केले. सागर रहाणे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in