महापौरांचे पती म्हणाले, तुम्हाला मारून कोणत्या वार्डात फेकू, माहितीही नाही पडणार...

राड्याच्या अनुषंगाने वाघ आणि पालीवाल यांनी काही सूचना केल्या. त्यानंतर कोणतेही कारण आणि अधिकार नसताना संजय कंचर्लावार यांनी मध्येच हस्तक्षेप केला. वाघ यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तुम्ही बाहेरगावचे आहात. सांभाळून रहा.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या इतिहासात कधी नव्हे, येवढा अभूतपूर्व गोंधळ काल उडाला. काल झालेल्या आमसभेत भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसचे सदस्य BJP and Congress members एकमेकांवर चालून गेले. त्यानंतर वातावरण एकदम तणावपूर्ण झाले. हा सर्व अंक झाल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार Meyor Rakhi Kancharlawar's husband corporator Sanjay Kancharlawar यांनी उपायुक्त विशाल वाघ Vishal Wagh यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 

सभागृहातील आखाडा आटोपल्यानंतर संजय कंचर्लावार उपायुक्त वाघ यांच्या कक्षात गेले. ‘तुम्ही बाहेरगावचे आहात. सांभाळून रहा. चारचौघे पाठवून कोणत्या वार्डात मारून फेकणार. कुणाला माहीत होणार नाही’, अशा शब्दांत त्यांनी वाघ यांना धमकावले. धमकावताना कंचर्लावार यांनी वाघ यांना अश्लिल शिवीगाळ केली. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. वाघ यांनी पोलिसात तक्रार केली असून संजय कंचर्लावार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

मनपाच्या आमसभेत काल प्रचंड राडा झाला. कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार केली. आमसभा आटोपल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ आणि अतिरिक्त विपिन पालीवाल यांना आपल्या कक्षात बोलविले. त्यावेळी महापौरांच्या कक्षात स्थायी समिती सदस्य रवी आसवानी, भाजपचे नगरसेवक देवानंद वाढई, चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर आणि महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार उपस्थित होते. 

यावेळी महापौरांनी आमसभेतील राड्याच्या अनुषंगाने वाघ आणि पालीवाल यांनी काही सूचना केल्या. त्यानंतर कोणतेही कारण आणि अधिकार नसताना संजय कंचर्लावार यांनी मध्येच हस्तक्षेप केला. वाघ यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तुम्ही बाहेरगावचे आहात. सांभाळून रहा. चारचौघे पाठवून कोणत्या वार्डात मारून फेकणार. कुणाला माहीत होणार नाही, अशी धमकी संजय कंचर्लावार यांनी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर वाघ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि २९४, ५०६, १८६ अन्वये गुन्हा दाखल केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com