गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांचा सत्ताधारी आघाडीतील पी. एन. पाटलांवर चकार शब्द नाही....

गोकुळचा प्रचार रंगात...
satej patil-p n patil ff.jpg
satej patil-p n patil ff.jpg

कोल्हापूर ः जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार सभा, मेळाव्यांनी चांगलीच रंगत आली असून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

गोकुळसाठी 2 मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीची मतमोजणी 4 मे रोजी रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होईल. प्रचाराला आता केवळ पाच-सहा दिवस राहिल्याने दोन्ही आघाड्यांकडून तालुकानिहाय मेळाव्यांचा धुमधडाका सुरू आहे. कोरोना रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांना फाटा देत सुरू असलेल्या या सभा, मेळाव्यांकडे प्रशासनानेचही दुर्लक्ष आहे. दोन्ही आघाड्यांकडील दिग्गज नेते प्रचारात उतरल्याने अखेरच्या टप्प्यात निवडणूक रंगतदार स्थितीत पोहोचली आहे.
सत्तारूढ गटाची संपूर्ण भिस्त आमदार पी. एन. पाटील यांच्यावर आहे. किंबहुना श्री. पाटील हाच सत्तारूढ गटाचा चेहरा आहे. विरोधकांनी श्री. पाटील यांच्याऐवजी सत्तारूढ गटाचे दुसरे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सुरू केले आहे.

या टिकेला श्री. महाडिक यांच्याऐवजी त्यांच्या स्नुषा व निवडणूक रिंगणातील उमेदवार सौ. शौमिका महाडिक यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विरोधी आघाडीकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करताना श्री. महाडिक यांनाच जास्त "टार्गेट' केले आहे.

संघात टॅंकर कोणाचे किती, महिन्याला महाडिक यांना किती मिळतात, त्यांच्या टॅंकर्संना "थ्रु' पास कसा मिळतो, नोकर भरती, त्याचा दर, वासाचे दूध, मल्टिस्टेटला केलेला विरोध हेच विरोधी आघाडीचे प्रचाराचे मुद्दे राहिले आहेत. सत्तारूढ गटाकडून विरोधी गटाच्या नेत्यांच्या बंद पडलेल्या संस्था आणि त्यांनी केलेल्या कारभारावरील टीकेबरोबरच दर दहा दिवसाला दिले जाणारे दुधाचे बिल, गेल्या 20 वर्षात संघाला मिळवून दिलेली प्रतिष्ठा, वासाच्या दुधाचे कमी झालेले प्रमाण आदी मुद्दे सांगितले जात आहेत.

ठरावदार मात्र सहलीवर
एकीकडे नेत्यांच्या प्रचार सभा सुरू असताना त्यातील आरोप-प्रत्यारोप ऐकायला ठरावदार मात्र नाहीत. बहुतांश ठरावदारांना दोन्ही आघाड्यांकडून सहलीवर पाठवले जात आहे. त्यामुळे ठरावदार नसताना होत असलेल्या टीका चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com