शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांनी महाडिकांच्या व्यवसायावर बोलू नये

तुमच्या महाविद्यालयाच्या दारात फी वाढीनंतर घडलेली घटना उभा महाराष्ट्र विसरलेला नाही.
Those who market education should not talk about Mahadik's business
Those who market education should not talk about Mahadik's business

गारगोटी (जि. कोल्हापूर) : शिक्षण हे समाजसेवेचे व्रत आहे. ते जोपासण्याऐवजी शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांनी महाडिकांच्या व्यवसायावर बोलू नये. महाडिक यांनी उद्योगधंद्यांमध्ये नावलौकिक मिळवला असून, त्या उद्योगधंद्यातील व्यावसायिक नीतिमूल्ये जपली आहेत. पालकमंत्र्यांनी शिक्षणाचा बाजार करून अनेक पालकांना लुबाडले आहे. शैक्षणिक नीतिमूल्ये रसातळाला घालवली असून, तुमच्या महाविद्यालयाच्या दारात फी वाढीनंतर घडलेली घटना उभा महाराष्ट्र विसरलेला नाही,’’ असा आरोप धैर्यशिल देसाई यांनी केला. 

गारगोटी येथे ठरावधारकांच्या मेळाव्यात धैर्यशिल देसाई बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विरोधकांकडून महाडिक यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. वास्तविक ही निवडणूक गोकुळची असून, ग्रामविकासमंत्र्यांनीच निवडणुकीत सकारात्मक मुद्दे असावेत, वैयक्तिक टीका टिप्पणी नसावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, पालकमंत्र्यांकडून ग्रामविकास मंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला आहे. व्ही. टी. पाटील यांची फसवणूक करून गारगोटीमधील मौनी विद्यापीठावर ताबा मिळवला. या संस्थेची सर्वसाधारण सभा घेतली नाही. नोकरभरतीत भ्रष्टाचार केला, विद्यार्थ्यांवर अन्याय केला, संस्थेची जागा परस्पर विकली आहे.''


महाडिकांना संपविण्याची भाषा करण्याइतकी कसली घमेंड आली आहे : धनंजय महाडिकांचा विरोधकांना टोला

गडहिंग्लज  : ‘‘महाडिक मुक्त जिल्हा करण्याची भाषा काही जण करीत आहेत. पण, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आतापर्यंत पाच निवडणुका लढविल्या. त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो. म्हणजे काय मी संपलो. लढाईच करायची असेल तर तत्त्वांची करा, विचारांची करा. महाडिकांना संपविण्याची भाषा करण्याइतकी कसली घमेंड आली आहे,’’ अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता निशाना साधला.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीचा गडहिंग्लजच्या गांधीनगरातील गणेश सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा झाला. त्यावेळी  माजी खासदार महाडिक यांनी विरोधकांवर टीका केली.

या वेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी मंत्री भरमू पाटील, गोकुळचे संचालक रणजित पाटील, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महाडिक म्हणाले, ‘‘दुष्काळ, अतिवृष्टीने राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण, कोल्हापुरात एकही आत्महत्या झाली नाही. कारण, गोकुळ आणि त्या माध्यमातून मिळणारा आर्थिक आधार आहे. गोकुळची ही निवडणूक सत्य विरुद्ध असत्य, पारदर्शकता विरुद्ध भ्रष्टाचार, नीती विरुद्ध अनीती अशी आहे. त्यामुळे निवडणूक फार लाईटली घेऊ नका. खरं तर निवडणूकच लागायला नको होती, इतका चांगला कारभार केला आहे. पण, मंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कोरोनाच्या असामान्य परिस्थितीत आपल्यावर निवडणूक लादली आहे. काय आहे गोकुळमध्ये? ज्यासाठी इतके कारस्थान केले जात आहे,’’ असा सवालही धनंजय महाडिक यांनी विरोधकांना विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com