`गोकुळ`मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या महाडिकांची संपत्ती आहे तरी किती?

गोकुळमध्ये अनेक वर्षे सत्ता असल्याने महाडिकांवर विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.
Mahdik Family Kolhapur
Mahdik Family Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात तेथील जिल्हा दूध संघ म्हणजेच `गोकुळ` नेहमीच चर्चेत राहतो. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी `गोकुळ`चा ब्रॅंड राज्यभर पोहोचवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोकुळची निवडणूक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांसाठी कसोटीची असते. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात या निवडणुकीच्या निमित्ताने पोहोचता येते. मतदार केवळ 3600 असले तरी संपूर्ण जिल्ह्याला आणि राज्याला या निवडणुकीबद्दल उत्सुकता आहे.

या निवडणुकीचा फड रंगला असून महादेवराव महाडिक विरुद्ध राज्यमंत्री सतेज पाटील असा सामना रंगला आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर होतात तसे आरोप महाडिकांवर होत आहेत. गोकुळच्या दूध वाहतुकीचे कंत्राट महाडिकांकडे असून त्या आधारे त्यांनी मोठा पैसा जमा केला आहे. त्या पैशाची मस्ती त्यांना आली आहे, अशी टीका सतेज पाटील करत आहेत. 

दुसरीकडे महाडिक हे सतेज पाटलांवर शिक्षणाच्या बाजारीकरणातून किती पैसे कमावले, असा प्रश्न विचारत आहेत.

गोकुळमध्ये महादेवराव हे सत्ताधारी असले तरी ते थेट संचालक किंवा अध्यक्ष म्हणून कार्यरत नसतात. रिमोट कंट्रोलद्वारे ते संघ चालवतात. यंदा पहिल्यांदाच महाडिकांच्या सूनबाई शौमिका अमल महाडिक या निवडणकुीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आणखीनच ही निवडणूक चुरशीची झाली आहे. यातील महाडिक आणि पाटील यांच्या संपत्तीचा स्वतंत्रपणे लेखाजोखा यानिमित्ताने मांडला जाणार आहे. 

महादेवराव महाडिक, त्यांचे पुत्र व माजी आमदार अमल महाडिक, पुतणे व माजी खासदार धनंजय महाडिक असे एकत्रित कुटुंब या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. हे कुटुंब श्रीमंत आहे, यात कोणाच्या मनात शंका नाही. पण या कुटुंबाकडे नक्की संपत्ती किती याचा शोध या निमित्ताने घेतला असता या तीनही नेत्यांची विविध निवडणुकांमधील संपत्तीची प्रतिज्ञापत्रे नजरेसमोर आणावी लागली. यातील मुख्य असलेले महादेवराव महाडिक यांचे 2015 च्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आहे. या निवडणुकीत ते सतेज पाटील यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी कोणतीच सार्वत्रिक निवडणूक न लढविल्याने त्यांचे संपत्तीविषयक ताजी माहिती `पब्लिक डोमेन` मध्ये नाही. 2015 च्या या माहितीनुसार महादेवरावांकडे 27 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे दिसून येते. त्यात आता सहा वर्षात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. त्या वेळी त्यांच्यावर एक कोटी 71 लाख रुपयांचे कर्ज होते.   कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे त्यांचे फ्लॅट आहेत. पंढरपूर येथे मोठी जमीन आहे. विविध कंपन्यांत सुमारे 11 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांच्या नावार

हे पाहता महाडिक कुटुंबाकडे या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे सुमारे 100 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे दिसून येत आहे.

टीप : यातील माहिती जुनी असल्याने त्यात बदल झाला असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com