लॉकडाऊनमध्ये खासदार उदयनराजेंची यांच्यावर नजर!

जलमंदीर पॅलेसमधूनते जिल्ह्यातील गोरगरिब जनतेला आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोचवत आहेत. कोणाची वाट पाहू नका, आपल्या कार्यकर्त्यांनीच मिळून सर्वांना मदत करावी, असा सल्लाही ते देत आहेत.
udayanraje
udayanraje

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सातारकरांसोबतच साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करताना वर्कफ्रॉम होमला प्राधान्य दिले आहे. जलमंदीर पॅलेसमधून ते जिल्ह्यातील गोरगरिब जनतेला आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोचवत आहेत. कोणाची वाट पाहू नका, आपल्या कार्यकर्त्यांनीच मिळून सर्वांना मदत करावी, असा सल्लाही ते देत आहेत. या कामांतून विरंगुळा म्हणून जुनी गाणी ऐकण्यासोबतच वृत्तपत्रांच्या वाचनावर त्यांनी भर दिला आहे. 


कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व सातारकरांनी एकजूट दाखवून घरातच थांबण्याला प्राधान्य दिले आहे. सातारकरांच्या हृदयसिंहासनावर आरूढ असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले लॉकडाऊनच्या कालावधीत नेमके काय करत आहेत. याची उत्सुकता सर्वांनाच आहे.


 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची उदयनराजे भोसले स्वतः अंमलबजावणी करत आहेत. त्यासोबतच ते जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी थांबून वर्कफ्रॉम होम करत आहेत. दिवसांतून दोन वेळा सातारा पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत.

यामध्ये ते सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दररोज दोन वेळा सातारा शहरातील कोरोनाचा आढावा घेत आहेत. त्यासोबतच पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून सातारा शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याची माहिती घेऊन काही सूचना करत आहेत.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सध्या गोरगरिबांसह हातावर पोट असलेल्या कुटुंबांना एकवेळचे जेवण मिळणे दुरापास्थ झाले आहे. अशा कुटुंबांसह विविध समाजातील लोकांना शोधून त्यांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते गोरगरिब कुटुंबे, तसेच विविध समाजातील कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तू घरपोच देत आहेत. या सर्व मदतीचा ते दिवसातून दोन वेळा आढावा घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्कफ्रॉम होमच्या माध्यमातून उदयनराजेंचे सातारा शहरासह जिल्ह्यावर लक्ष ठेऊन आहेत. दिवसभरातील कामांतून विरंगुळा म्हणून जुनी हिंदी व मराठी गाणी ऐकण्यासोबतच वृत्तपत्रांच्या वाचनावर त्यांनी भर दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com