सातारा रेड झोनच्या छायेत?

कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्यापैकी १५३ जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले होते. त्यामुळे सातारकरांना दिलासा मिळाला असतानाच आज अचानक कऱ्हाड तालुक्यातील दोन तरूणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत.
corona satara
corona satara

सातारा : नागपूर आणि पुण्याहून कऱ्हाड तालुक्यात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आज आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १३ झाली आहे. नागपूरहून प्रवास करून आलेल्या बाबरमाची येथील ३५ वर्षीय तरूण तर पुण्याहून प्रवास करून आलेल्या चरेगाव येथील ३० वर्षीय तरूणाचा यामध्ये समावेश आहे. दोघांवर कृष्णा हॉस्पिलटच्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 
 
सातारा जिल्ह्यात बुधवारी (ता. १५) कोरोनाचे अचानक चार रूग्ण सापडले होते. यामध्ये कऱ्हाडातील दोन, पाटण तालुक्यातील एक तर फलटणमधील एका
महिला डॉक्टरचा समावेश होता. त्यानंतर दोन कोरोना बाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते.

 तसेच कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्यापैकी १५३ जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले होते. त्यामुळे सातारकरांना दिलासा मिळाला असतानाच आज
अचानक कऱ्हाड तालुक्यातील दोन तरूणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत. कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने साताऱ्याची वाटचाल रेड झोनच्या दिशने निघाल्याचे चित्र आहे.

यातील बाबरमाची (ओगलेवाडी जवळ) येथील ३५ वर्षीय तरूण मागील महिन्यात नागपूरवरून प्रवास करून आलेला आहे. त्याचा घसा दुखणे व ताप येत असल्याने त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू  होते. कऱ्हाड उप जिल्हा रूग्णालयात घसा व ताप येत असल्याने उपचार घेत असलेला चरेगाव (उंब्रज जवळ) येथील कोरोना संशयित (वय ३०) गेल्या महिन्यात पुण्याहून आला होता.

त्याचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असे बीजे वैद्यकिय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. दोन्ही ठिकाणी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार वैद्यकिय अधिकाऱ्याच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

आज दिवसभरात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या नऊ तसेच उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे दाखल असलेले चार अशा
एकूण 13 संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या
कोरोनाबाधिताच्या निकट सहवासित 13 नागरिकांचे 14 दिवसानंतरच्या पुर्नतपासणीसाठी घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे
पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com