संजय राऊतांना सत्तेची मस्ती आल्याने राज्यपालांबद्दल फालतू व निर्लज्ज शब्द : राणे

कोरोनाच्या पेचप्रसंगात उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीवरून वाद रंगला आहे...
sanjay raut-rane
sanjay raut-rane

पुणे : राज्यपाल विरुद्ध शिवसेना अशा सुरू असलेल्या वादात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आता उडी घेतली आहे. राज्यपालांबद्दल आक्रमक भाषा वापरणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना त्यांनी झाडले आहे.

``राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है! ,``अशा शब्दांत राणे यांनी राऊत यांना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मंत्रीमंडळाने ठराव केला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्या आधी भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला होता.

त्यानंतर राऊत यांनी आक्रमक ट्विट करत `राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है!, `असे शब्द वापरले होते. 

त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या वादात उडी घेतली. "कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेचे जे होईल ते होईल; मात्र मी परत सत्तेत येईन' यासाठी सुरू असलेले विरोधी पक्षाचे प्रयत्न म्हणजे कोत्या मनाची मानसिकता दर्शवते, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत जाण्यासाठी राज्यपालांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, की त्यांना हा प्रस्ताव मान्य करावा लागेल. कारण घटनात्मकदृष्ट्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा राज्यपालांना फार काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. पत्रावर त्यांना सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सक्षम असून, ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते हे सरकार कोसळणार या भावनेतून सुरुवातीपासूनच टपलेले आहे. याचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षाच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com