सत्तारांनी मागितले आणि अजित पवारांनी तत्काळ दोन कोटी मंजूर केले

आपल्या मतदारसंघातील सभा मंडपासाठी दोन कोटी रुपयांचा निधी द्या अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही तात्काळ निधीला मंजुरी दिली.
Ajit Pawar grants 2 crore money to Abdul Sattar
Ajit Pawar grants 2 crore money to Abdul Sattar

औरंगाबादः आपल्या मतदारसंघातील सभा मंडपासाठी दोन कोटी रुपयांचा निधी द्या अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही तात्काळ निधीला मंजुरी देत महाविकास आघाडी सरकारमधील समन्वय आणि वेगवान निर्णयाची ओळख सभागृहाला करून दिली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकमेकांच्या तंगड्यात तंगडे घालूनच पडेल, तीन पक्षांचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे सरकार अमर-अकबर-अॅन्थनी सरकार आहे, अशी टीका विरोधकांकडून विशेषता अब्दुल सत्तार यांचे विरोधक केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून केली गेली. परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम आणि समन्वयाने निर्णय घेत असल्याचे या तीन पक्षाच्या नेत्यांनी कृतीतून वारंवार दाखवून दिले.

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले शिवसेनेचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धोत्रा येथील सिध्देश्वर संस्थानच्या सभा मंडपासाठी दोन कोटी रुपये निधीची मागणी केली होती. सत्तार यांची सिध्देशवर महाराजांवर श्रध्दा आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी सत्तार यांनी सभा मंडपासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

राज ठाकरे यांच्यानंतर कोरोनावरून प्रकाश आंबेडकरांचाही सरकारवर आरोप

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात संस्थानच्या सभा मंडपासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्याची घोषणा करत सत्तार यांनी मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची पुर्ती केली. धोत्रा येथील सिध्देश्वर संस्थान हे मराठवाड्यात प्रसिध्द आहे.

राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. या संस्थानचे महत्व लक्षात घेता येथील सभामंडपासाठी निधी मिळवून देण्याचा शब्द अब्दुल सत्तार यांनी भाविकांना दिला होता. त्यानूसार आज दोन कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com