राज ठाकरे यांच्यानंतर कोरोनावरून प्रकाश आंबेडकरांचाही सरकारवर आरोप

आपल्याकडील लोकसंख्येच्या तुलनेत संशयित किंवा कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्य सरकार लोकांना भिती दावत असल्याचा आरोप केला आहे.
praksh ambedkar criticizes government over covid19
praksh ambedkar criticizes government over covid19

औरंगाबाद : सरकार कोरोनावरून लोकांमध्ये विनाकारण भितीचे वातावरण तयार करत आहेत, आपल्याकडील लोकसंख्येच्या तुलनेत संशयित किंवा कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्य सरकार लोकांना भिती दावत असल्याचा आरोप केला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यात यापुर्वी राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करत लोकांना पॅनिक करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबडेकरांनी देखील याच मुद्यावरून सरकारवर टिका केली आहे.

भटके विमुक्त आदिवासी परिषदेला संबोधीत करण्यापुर्वी सुभेदारी विश्रामगृह येथे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाचा धोका असला तरी घाबरून जाण्याइतपत परिस्थिती आपल्या देशात किंवा राज्यात नाही. परंतु सरकारकडून लोकांना भिती दाखवण्यात येत आहे. संकट येतात जातात पण त्यामुळे निवडणुका स्थगित किंवा पुढे ढकरणे हा पर्याय नाही. प्रशासनाने यातून मार्ग काढत महापालिकेच्या निवडणुकात ठरलेल्या मुदतीत घेतल्या पाहिजे असे मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले.

एनआरसी, एनपीआर आणि सीएए संदर्भात बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या कायद्याला देशभरातील जनतेचा विरोध आहे, जे लोक कायद्याला विरोध करतील त्यांना दाबण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातोय. जे लोक आंदोलनात सहभागी होत आहेत, त्यांची नावे नागरिकत्व कायद्यातून कायमची वगळण्यात येऊ शकतात अशी परिस्थीती निर्माण करण्यात आली आहे.

कुठल्याही परिस्थितीत एनआरसी, सीएएच्या विरोधातील आंदोलन कुमकूवत करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. परंतु एप्रिल- मे नंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळेल असा धोक्याचा इशारा देखील आंबेडकरांनी यावेळी दिला. एस बँके पाठोपाठ लवकरच देशभरातील आणखी पाच मोठ्या बँका बुडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगतानाच देशात अराजकता माजवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com