18 कोटींची रेल्वे पीट लाईन वीस वर्षापासून रखडली - इम्तियाज जलील

रेल्वे पीटलाईनची मागणी पुर्ण झाली तर मराठवाड्यात अनेक रेल्वे गाड्या येऊ शकतात, तेव्हा पीटलाईनचा मार्ग तात्काळ मार्गी लावावा अशी आग्रही मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत केली.
Aurangabad railway pit linework pending since 20 years says Imtiyaz Jaleel
Aurangabad railway pit linework pending since 20 years says Imtiyaz Jaleel

औरंगाबादः  मराठवाडा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे विकासासाठी आवश्यक असलेल्या पीटलाईनची मागणी गेल्‍या वीस वर्षांपासून आम्ही वारंवार करतोय. औरंगाबाद रेल्वेस्थानकात जागा उपलब्ध असतांना केवळ १८ कोटी रुपयांचा खर्च रेल्वे बोर्ड करण्यास तयार नाही. रेल्वे पीटलाईनची मागणी पुर्ण झाली तर मराठवाड्यात अनेक रेल्वे गाड्या येऊ शकतात, तेव्हा पीटलाईनचा मार्ग तात्काळ मार्गी लावावा अशी आग्रही मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत केली.

रेल्वे अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करतांना इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यासाठी अत्यावाश्यक असलेले मनमाड- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि रेल्वे पीटलाईनच्या मुद्याकडे रेल्वे मंत्र्यांचे लक्ष केंद्रित केले. 

इम्तियाज जलील म्हणाले, रेल्वे विकासाच्या बाबतीत मराठवाडयावर कायमच अन्याय करण्यात आलेला आहे. मराठवाडा रेल्वेचा भाग मध्य रेल्वेला जोडावा ही गेल्या अनेक वर्षांची मागणी देखील रेल्वे मंत्रालयाकडे पडून आहे. कोकण रेल्वे विकास मंडळाच्या धरतीवर मराठवाडा रेल्वे विकास स्वंतत्र मंडळ स्थापन करावे ही देखील आमची मागणी आहे.

पण रेल्वेमंत्रालय आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर एका ओळीचे उत्तर पाठवून पाणी फिरवण्याचे काम करत आले आहे. पीटलाईन आणि रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, दुहेरीकरण झाल्यास या भागाच्या विकासावर खूप मोठा चांगला परिणाम होणार आहे. तेव्हा रेल्वे मंत्री जे सबका विकासचा दावा करतात त्यांनी थोडा आमच्या भागाचाही विकास करावा. 

प्रत्येक ठिकाणी फायद्या तोट्याचे मोजमाप तुम्हाला लावता येणार नाही. मुंबई, दिल्लीची तुलना औरंगाबादशी केली जाऊ नये. एखाद्या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्राला निधी द्यावा लागतो असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी लगावला.

रेल्वे भुयारी मार्गासाठी ६ कोटी द्या..
औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागात रेल्वे भूयारी मार्ग तयार करावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करण्यात आली. निवेदन देऊन निधी देण्याची मागणी केली गेली. रेल्वे पटरीच्या पुढे दोन लाख लोक राहतात. त्यांना शहरात येण्यासाठी रेल्वे फाटकावर तासनतास ताटकळत उभे राहावे लागते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी ३८ कोटी रुपयांचे अंदापत्रक तयार केले आहे. रेल्वे बोर्डाने जर हे काम केले तर त्यासाठी फक्त ६ कोटी रुपये खर्च लागणार आहे. आमच्या अनेक मागण्या आहेत, पण रेल्वे पीटलाईनसाठी १८ कोटी व शिवाजीनगगर येथील भूयारी मार्गासाठी ६ कोटींचा निधी मंजूर करून ही कामे लवकरात लवकर पुर्ण केली तर आम्हाला मोठा दिलासा मिळेल असेही इम्तियाज जलील यांनी रेल्वे मंत्र्यांना उद्देशून सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com