शिरूरमधील पहिलवान नेत्यावर  प्राप्तिकर खात्याचा छापा 

पुणे जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते भल्या-बुऱ्या मार्गांनी गडगंज झाले आहेत. मात्र त्यांच्यावर कधीच कारवाई का होत नाही, असा सवाल सामान्य जनतेला पडत होता. रांजणगावएमआयडीसीतून मोठ्या प्रमाणात हात मारणाऱा एक नेता अखेर प्राप्तिकर विभागाच्या जाळ्यात आला. इतर माशांचे काय, याप्रश्नाचे उत्तर केव्हा मिळणार?
शिरूरमधील पहिलवान नेत्यावर  प्राप्तिकर खात्याचा छापा 

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजकारणात अनेक राजकीय कोलांट्या मारून चर्चेत राहिलेल्या शिरूर तालुक्‍यातील एका पहिलवान नेत्याच्या दोन घरांवर आज पहाटे तीन वाजता प्राप्तिकर खात्याने छापा टाकला. या नेत्याच्या शिक्रापूर, महंमदवाडी दोन्ही ठिकाणच्या निवासस्थानांबरोबर त्यांचे मित्र व जवळचे नातेवाईक या सगळ्यांच्याच घराची झडती प्राप्तिकर खात्याच्या पथकाने सुरू केली. 

शिक्रापूरच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्द सुरू करून शिरुर तालुक्‍यासह जिल्ह्याच्या राजकारणातही आपल्या हटके राजकारणाने या नेत्याने लक्ष केंद्रीत करून घेतले. लक्ष्मीदर्शनाच्या अनोख्या फंड्याने थेट राज्यातील नेत्यांनाही आव्हान देत जेरीस आणणारा म्हणून या नेत्याची ओळख आहे. शिरूर तालुक्‍यातील एमआयडीसी उद्योगात बराच हात मारल्याबद्दल या नेत्याची ख्याती आहे. पोलिसांच्या तडीपार गुंडाच्या यादीत या नेत्याचा कधी काळी समावेश होता. आलिशान गाड्यांचा या नेत्याला शौक आहे. या नेत्याच्या अनेक निवडणुकांत पैशाचा कसा वापर होतो, याच्या कथा आजही चुरसपणे चर्चिल्या जातात. या संपूर्ण कारवाईत शहर पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून स्थानिक व जिल्हा पोलिस दलाला या कारवाईत सहभागी करुन घेतलेले नाही. वास्तविक ग्रामिण भागातील इतर स्थानिक पोलिस स्टेशनच्या स्टेशन डायरीत नोंद करुन इतर पोलिस स्थानिक कारवाई करतात. मात्र आजच्या कारवाईत अशी कुठलीच कामकाज पद्धत वापरली गेली नसल्याने जिल्हा पोलिसांना या कारवाईपासून चार हात दूरच ठेवल्याचीही चर्चा आहे. 

वाचा अधिक बातम्या-

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com