आबा दीपस्तंभ होते 

आबा दीपस्तंभ होते 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री आणि समाजातील प्रत्येक घटकांना आपलेसे वाटणारे दिवंगत नेते आर.आर. पाटील उर्फ आबा यांच्या आठवणींना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांनी उजाळा दिला. तसेच त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदान कदापि विसरता येणार नसल्याचे म्हटले आहे. 

शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या ट्विटरवर या लाडक्‍या नेत्याची आठवण काढत त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. 
शरद पवार यांनी म्हटले आहे, की आबांची उणीव कधीच भरून निघणार नाही. आबांसारखे नेते पक्षातील कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभ होते. ग्रामोन्नतीचे, व्यसनमुक्त समाजाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. सतत आमच्या स्मरणात असणाऱ्या आबांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "" एक प्रामाणिक राजकीय नेता, आपल्या सर्वांच्या लाडक्‍या आबांच्या स्मृती आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील. 
खासदार सुप्रिया सुळे यांनीही आबांना अभिवादन केले. त्या म्हणतात,"" आबा.. तुमच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून येणे अशक्‍य आहे.'' 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणतात, "" आबांची उणीव कायम भासत राहिल, त्यांच्या समाजोन्मुख कार्याचा वसा पुढे नेणे हीच त्यांना जयंतीदिनी खरी आदरांजली ठरेल. 

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ, डॉ. गजानन देसाई, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज आबांच्या आठवणींना उजाळा दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com