सुनील शेळके बाळा भेगडेंची हॅटट्रिक हुकविणार का?

भाजप पक्षश्रेष्ठींनी मावळातून कुठल्याही उमेदवाराला तिसऱ्यांदा संधी दिलेली नाही.तर, राष्ट्रवादीने ही संधी देऊनही बाळा भेगडे यांनी ती चुकविण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आता बाळा भेगडेंना उमेदवारीची हॅटट्रिक मिळून ते आमदारकीची हॅटट्रिक करणार का याकडे मावळचेच नाही,तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे व त्यातही भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Bala Bhegde - Sunil Shelke
Bala Bhegde - Sunil Shelke

पिंपरी : मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांना विधानसभेच्या नांदीला मंत्रीपद भेटल्यामुळे मावळच्या भाजपच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. असे असली तरी, स्वपक्षातूनच भेगडेंना कडवे आव्हान उभे करणारे सुनिल शेळके यांनी मात्र आशा सोडलेली नाही.पक्षश्रेष्ठी नक्कीच न्याय देतील,या आत्मविश्वासावर तळेगावचे नगरसेवक  शेळके यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची राळ आताच उडवून दिली आहे.

भाजप पक्षश्रेष्ठींनी मावळातून कुठल्याही उमेदवाराला तिसऱ्यांदा संधी दिलेली नाही.तर, राष्ट्रवादीने ही संधी देऊनही बाळा भेगडे यांनी ती चुकविण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आता बाळा भेगडेंना उमेदवारीची हॅटट्रिक मिळून ते आमदारकीची हॅटट्रिक करणार का याकडे मावळचेच नाही,तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे व त्यातही भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मावळचा हा उमेदवारी व आमदारकीचा विक्रम अद्याप अबाधित राहिल्यानेच  उमेदवारी आपल्याला मिळेल,अशी आशा नव्हे खात्री शेळके यांना वाटते आहे.

त्यामुळे त्यांनी आतापासूनच नव्हे, तर गेल्या काही महिन्यापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. पुन्हा उमेदवारीची आशा धरु नये म्हणून भेगडेंना राज्यमंत्रीपद दिल्याचे शेळकेंच्या समर्थकांचे म्हणणे आहे. तर, मंत्रीपदामुळे उमेदवारी नक्की झाल्याचा भेगडे समर्थकांचा त्याला प्रतिवाद आहे. दरम्यान, भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तरी,शेवटपर्यंत भाजपच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. दुसरीकडे शिवसेनेकडूनही उमेदवारी मिळवण्याचा पर्याय त्यांनी लोकसभेच्या प्रचारा दरम्यानच खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी सलगी वाढवून आधीच सुकर करुन ठेवला आहे. 

वेळ आल्यास अपक्ष लढण्याची देखील तयारी ठेवली असल्याचे ते राबवत असलेल्या कार्यक्रम व त्यांच्या बॅनरमधून दिसून येत आहे. दुसरीकडे तुलनेने राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मावळात कमी आहे.त्यामुळे तेथे उमेदवारीसाठी मोठी चुरस असलेल्या भाजपचा उमेदवार कोण याविषयी मावळवासीय मतदारांत कमालीची उत्सुकता आहे. 

हे देखिल वाचा -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com