आता कृपाशंकरसिंह यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा

आता कृपाशंकरसिंह यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला महाराष्ट्राच्या विविध भागात जोरदार धक्के बसत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर "गयारामां ' नी कॉंग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. अशातच मुंबईतील एक मातब्बर कॉंग्रेस नेता आणि माजी मंत्री भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. 

मुंबई कॉंग्रेसमधील मोठे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांची गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगलीच जवळीक वाढली आहे. त्यातच गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या भेटीने कृपाशंकर सिंग यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच कृपाशंकर सिंह यांची सत्ताधारी भाजपबरोबर जवळीक सुरू आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार का ? या चर्चेला आता जोर आला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com