Rohit Pawar Answers Criticism By Amit Shah on Sharad Pawar | Sarkarnama

अमित शहांची डबल ढोलकी : रोहित पवार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?', असा सवाल अमित शहा यांनी जाहीर सभेत विचारला होता. त्याचा रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे.

पुणे : गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. 

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?', असा सवाल अमित शहा यांनी जाहीर सभेत विचारला होता. त्याचा रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवरुन त्यांनी तसे ट्वीट केले असून फेसबूक पेजवरही सविस्तर टीका केली आहे. 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात.....
पण आत्ता बास झालं.....
साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवावं अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज आयटी कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते आयटी पार्क उभा करण्यापर्यन्तची ही शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे. सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया.

लवकरच ठरवुया… 
कधी कुठे आणि कशी सुरवात करायची. पण एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपणा तरुणांनाच पुढे घेवून जावी लागणार आहे.......

हे देखिल वाचा -

विधानसभेला पिंपरीच त्रांगडे युतीच्या तिन्ही पक्षांचा क्लेम

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख