एकनाथराव खडसे भाजपला हवे आहेतच; मग अडतेय कुठे?

एकनाथराव खडसे भाजपला हवे आहेत, मग त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न नेमका अडतोय कुठे? हाच खरा प्रश्‍न भाजपच्या कार्यकर्त्यांनाही पडल आहे.
why does BJP not giving opportunity to eknathrao khadse asks loyal
why does BJP not giving opportunity to eknathrao khadse asks loyal

जळगाव : जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या पूर्वसंध्येला भाजपचे नेते व माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने जळगावला येतात. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा करतात, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाजपचा होतो. राज्यसभेसाठी एकनाथराव खडसे यांचे नाव आम्ही महाराष्ट्रातून दिले आहे. मात्र काय झाले माहित नाही, मात्रा आता आम्ही विधानपरिषदेसाठी त्यांना विचार करू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सांगतात. याचा अर्थ एकनाथराव खडसे भाजपला हवे आहेत, मग त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न नेमका अडतोय कुठे? हाच खरा प्रश्‍न भाजपच्या कार्यकर्त्यांनाही पडल आहे.


राज्यात भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत एकनाथराव खडसे यांचा मोलाचा वाटा आहे. हे कुणीही नाकारणार नाही. पक्षाची राज्यात सत्ता आणण्यातही गेल्या वेळी त्यांचा वाटा मोठा होता, त्यामुळे त्यानीं मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची नाराजी झाली अन त्याचा त्यांना फटका बसला त्यावेळी त्यांचे मंत्रीपद तर गेलेच परंतु कालातरांने पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारीही दिली नाही. त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली मात्र तीचाही पराभव झाला. त्यानंतरही खडसे यांचे पक्षासाठी कार्य सुरूच आहे. पक्षात खडसे यांचे पुनवर्सन होईल अशा चर्चा सुरू होत्या. 

राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती, अगदी प्रदेशतर्फे त्यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती, असे स्वत: प्रदेशाध्यक्षानीच सांगितले आहे. मात्र त्यानंतरही त्यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेली नाही. याबाबत मात्र पक्षातर्फे कोणतीही अधिकृत माहिती देण्यात येत नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात, विधानपरिषदेसाठी आम्ही त्यांचा विचार नक्की करू, मात्र आता या वक्तव्याबाबत विश्‍वासाचे प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

एकनाथराव खडसे भारतीय जनता पक्षाला सद्यस्थितीत हवे आहेत, त्यांची आक्रमकता, अभ्यासूपणा हा राज्यात सद्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपला फायद्याचा ठरणार आहे, शिवाय विधानपरिषदेत ते सरकारला निश्‍चित धारेवर धरू शकतील याचा सर्वानाच विश्‍वास आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पुर्नवसनाबाबत सकारात्मकता आहे. मग नेमके अडते कुठे? याबाबत पक्षनेतृत्व खुलासा करण्यास तयार नाही. मात्र खडसेंना आणि त्यांच्या समर्थकांना आता राजकीय पुर्नवसनासाठी आता पुन्हा विधानपरिषदेसाठी प्रतिक्षा मात्र आहे. मात्र अडलेले घोडे बाजूला होईल तेव्हांच हे शक्‍य होईल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com