चंद्रकांत पाटलांनंतर आता मुख्यमंत्र्यांचंही मोठं विधान; दानवेंना म्हणाले, भावी सहकारी!

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

औरंगाबाद : 'माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवस थांबा', असं वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरूवारी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोठं विधान केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एका कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री रावसाहबे दावने (Raosaheb Danve) यांच्याकडं बघत मुख्यमंत्र्यांनी युतीचे सुचक विधान केलं आहे. (Uddhav Thackeray gives hint about future alliance with BJP)

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दानवे यांच्यासह केंद्री राज्यमंत्री भागवत कराड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरूवात करतानाच मोठं विधान केलं. 'व्यासपीठावर उपस्थित असलेले आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी', असं मुख्यमंत्री म्हणाले. या वक्तव्यामुळे शिवसेना व भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हे विधान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दानवे व कराड यांच्याकडे मागे वळून पाहिलं. त्यामुळं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्यासपीठावर बाळासाहेब थोरात हे आजी सहकारी तर दानवे हे माजी सहकारी होते. त्यामुळं या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही पुनरूच्चार केला. एकत्र आले तर ते भावी सहकारी ठरतील. भावी काळचं ठरवेल, असंही ते म्हणाले. 
 
पाटील यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमासह पत्रकार परिषेदत भाजपच्या नेत्यांबाबत भावी सहकारी असं वक्तव्य केल्यानं तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. 

दरम्यान, मुंबईत शिवसेनेच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शिवेसनेचे नेते संजय राऊत यांनी गुरूवारी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर भाष्य केलं. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील सगळ्यांना सांगत होते की मला माजी मंत्री म्हणून नका. दोन दिवस थांबा. मी त्यांना फोन करून सांगितलं, 'तुम्ही पुढील 25 वर्ष माजी मंत्री राहणार.' कारण ज्याप्रकारचं सरकार महाराष्ट्रात आपण स्थापन केलं आहे, ते केवळ पाच वर्षांसाठी नसून 25 वर्षांसाठी आहे. या राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. जेव्हा ठाकरे राज्याचे नेतृत्व करतात, ते अर्धवट सोडून जात नाहीत. ते पूर्ण काळासाठी करतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com