धक्कादायक : शिक्षकांची शाळेतच रंगली दारू अन् मटन पार्टी

हाप्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनानं मनोज ठोंबरे व शांताराम चव्हाण या शिक्षकांना तातडीनं निलंबित केलं आहे.
Buldhana
Buldhana

बुलडाणा : कोरोना (Covid-19) संकटामुळं शाळा बंद असून बहुतेक शाळांमध्ये शिक्षकांकडून व्हर्च्यूअल वर्ग घेतले जात आहेत. शाळेत विद्यार्थी नाहीत अन् फारसं कामही नाही. त्यामुळं काही शिक्षकांकडून या संधीचा गैरफायदा घेतला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दोन शिक्षकांनी शाळेच्या आवारात दारू व मदन पार्टी केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना जिल्हा प्रशासनानं निलंबित केलं आहे. (Two teachers suspended for drinking on school premises)

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील शिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनानं मनोज ठोंबरे व  शांताराम चव्हाण या शिक्षकांना तातडीनं निलंबित केलं आहे. शिक्षकांच्या रंगलेल्या पार्टीची व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत. 

दुसऱ्या एका घटनेत जिल्हा प्रशासनाने एका शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केलं आहे. हडियामहाल येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक इरफान सुरतने यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याचे ढीग लागल्याचे आढळून आले आहे. 

परिसरात दुर्गंधी पसरून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणणे, मुख्याध्यापक पदाच्या कर्तव्यात कसूर करून सेवा नियमांचा भंग केल्यामुळे त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचेही निलंबन करण्यात आले आहे. या काळात त्यांना कोणतीही खाजगी नोकरी किंवा उद्योग करता येणार नाही, असंही निलंबन आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.  

बुलडाण्यात एकाच दिवशी मुख्यध्यापकांसह तीन शिक्षकांना निलंबित कऱण्यात आल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोरोना काळात काही शिक्षकांकडून गैरवर्तन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून याबाबत कोणती पावलं उचलली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com