पंतप्रधान मोदी वाढदिवशी देशवासियांना देणार मोठं गिफ्ट?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पेट्रोल व डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्यावर मंथन होणार असल्याची चर्चा आहे.
Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा शुक्रवारी 71 वा वाढदिवस आहे. देशभरातून विविध उपक्रमांच्या माध्यमांतून भाजपसह विविध राजकीय नेते, संघटनांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना वाढदिवशी मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (GST Council meeting to be held today in lucknow)

देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यातच एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. त्यामुळं दरवाढ कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. 

लखनऊ येथे जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पेट्रोल व डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्यावर मंथन होणार असल्याची चर्चा आहे. देशात बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलचे दर 90 ते 95 रुपयांच्यादरम्यान आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू केल्यास हे दर खूप खाली येऊ शकतात. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल व डिझेलवर जीएसटी लागू केल्यास देशभर 28 टक्के कर लागू होईल. म्हणजेच विविध राज्यांमध्ये असलेले सर्वप्रकारचे कर रद्द होऊन केवळ जीएसटी असेल. असं झाल्यास इंधनाचे दर 30 ते 40 टक्कयांनी खाली येऊ शकतात. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. त्यामुळं जीएसटी कौन्सिलच्या बैठकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, भाजपनं नरेंद्र मोदी यांनाही मोठं गिफ्ट देण्याची तयारी केली आहे. देशभरातील भाजपशासित राज्यांकडून आज मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. देशभरातील दैनंदिन लसीकरण दीड ते दोन कोटींवर नेण्याचं लक्ष्य आहे. अधिकाधिक लसीकरण करून पंतप्रधान मोदींना गिफ्ट देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com