राम मंदिराला विरोध करणारे पासवान भाजपसोबत जातात मग आम्ही वाटेल ते करू!

शिवसेना युपीएमध्ये सहभागी झाली आहे का?, यावर संजय राऊत यांनी गुगली टाकली.
MP Sanjay Raut clarifies about joining UPA
MP Sanjay Raut clarifies about joining UPA

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनेकडून सतत भाजपवर टीकास्त्र सोडलं जात आहे. तसेच दिल्लीत विरोधकांच्या बैठकांनाही खासदार संजय राऊत यांची उपस्थिती असते. त्यामुळं शिवसेना युपीएमध्ये सहभागी झाली आहे का?, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना राऊत यांनी ही शक्यता थेट फेटाळून लावली नाही. राम मंदिराला विरोध करणारे रामविलास पासवान भाजपसोबत जाऊ शकतात तर आम्ही आम्हाला वाटेल ते काही करू शकतो, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. (MP Sanjay Raut clarifies about joining UPA)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येत्या 20 ऑगस्ट रोजी सर्व विरोधकांची व्हर्च्यूअल बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशभरातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यानही शिवसेनेचे नेते विरोधकांच्या बैठकांना हजर राहत होते. सरकारविरोधातील आंदोलनातही राऊत यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळं शिवसेना आता अधिकृतपणे युपीएमध्ये सहभागी झाली आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 

माध्यमांनी विचारलेल्या या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी याचं थेट उत्तर देण्याचं टाळलं. यावर गुगली टाकत ते म्हणाले, रामविलास पासवान यांचा राम मंदिराला विरोध होता, तरीही ते भाजपमध्ये जाऊ शकतात. तर मग आम्ही आम्हाला वाटेल ते करू. पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी भेटण्यात गैर काय आहे? तसंच UPA अध्यक्षांनी जर बैठक बोलावली असेल आणि सोनिया गांधींना उद्धव ठाकरे भेटत असतील तर त्यात वावगं काय आहे? महाराष्ट्रात आम्ही सत्तेत एकत्र आहोत.

कुठेही गेलो कोणासोबतही बसलो तरीही शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही ठरवू कुठे जायचे तुम्ही सांगू नका. आम्हाला आमचा गुगल मॅप माहित आहे. यूपीएत सहभागी व्हायचे की नाही हा शिवसेनेचा प्रश्न आहे. शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवू नये, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com