आता जगायचं कसं; कोरोना रोखण्यासाठी असाही अघोरी लॉकडाऊन...  

डेल्टा व्हेरिएंटने डोकंदुखी वाढवली असून दिवसेंदिवस रुग्ण वाढत चालले आहेत.
Covid19 Lockdown in China Residents being locked up in homes
Covid19 Lockdown in China Residents being locked up in homes

बीजिंग : जगभरात कोरोनाचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील वर्षी भारतासह अन्य देशांच्या तुलनेत चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण डेल्टा व्हेरिएंटने डोकंदुखी वाढवली असून दिवसेंदिवस रुग्ण वाढत चालले आहेत. आता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी चीनमध्ये लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी लोखंडी बार ठोकून दरवाजे सीलबंद केले जात आहेत. या अघोरी लॉकडाऊनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Covid19 Lockdown in China Residents being locked up in homes)

मागील वर्षी चीनमधील वुहान प्रातांत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वुहानमध्येच जगातील पहिला लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांची घरं सीलबंद केली जात होती. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने चीनची पावलं पडू लागल्याचं तैवान न्यूज या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. 

चीनी अधिकारी लोकांच्या घराबाहेर दरवांना लोखंडी बार ठोकत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळं लोकांना दरवाजा उघडणंही शक्य होणार नाही. एका ट्विटर पोस्टमध्ये एका व्यक्तीने म्हटलं आहे की, एका व्यक्तीनं क्वारंटाईन नियमांचं उल्लंघन केलं म्हणून त्याला पकडण्यात आलं. तो बाहेर मोकळ्या हवेत फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी फर्मान काढत दिवसभरात तीनपेक्षा जास्तवेळा बाहेर पडल्यास घरातच बंद ठेवले जाईल, असं जाहीर केलं आहे.

एका ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये लोकांना अधिकारी इशारा देत आहेत. एका इमारतीत एक रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस सील केली जाईल, असं हे अधिकारी म्हणत आहेत. लोकांना बाहेर येण्यापासून मज्जाव केला जात आहे. बाहेर आल्यास त्यांची घर सीलबंद केली जाणार असल्याची घोषणा अधिकारी करत आहेत.

तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं नऊ ऑगस्ट रोजी कमीत कमी 15 प्रांतांमध्ये कोरोनाचे 143 रुग्ण आढळल्याचे जाहीर केलं आहे. हे रुग्ण 20 जानेवारीनंतरचे सर्वात जास्त आहेत. तुलनेनं रुग्णसंख्या कमी असली तरी चीनमध्ये कोरोना प्रोटोकॉलनुसार नागरिकांवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com