Kailash Vijayvargiya break corona protocol to enter in temple
Kailash Vijayvargiya break corona protocol to enter in temple

भाजप नेत्याची कोरोना प्रोटोकॉल तोडून मंदिरात घुसखोरी; पुजाऱ्यांनाही नाही प्रवेश

सध्या पुजाऱ्यांशिवाय कुणालाही गाभाऱ्यात जाण्यासाठी परवानगी नाही.

भोपाळ : भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. त्यांनी मुलगा आकाश आणि भाजप आमदार रमेश मेंदोला यांच्यासह मंदिरात कोरोना प्रोटोकॉल तोडून घुसखोरी केल्यानं वाद निर्माण झाला आहे. हे तिघे शुक्रवारी पहाटे मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात गेल्यानंतर प्रशासनाने सर्व दरवाजे बंद केले. तसेच मंदिरातील सीसीटीव्हीही बंद केल्याचे सांगितले जात आहे. मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनाही प्रवेश न दिल्याने दैनंदिन भस्म आरतीला विलंब झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Kailash Vijayvargiya break corona protocol to enter in temple)

महाकाल मंदिरात पहाटे चार वाजता आरती करण्यासाठी मुख्य पुजारी अजय आणि अन्य पुजारी चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचले. त्यावेळी त्यांना दरवाजे बंद दिसून आले. त्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर थोड्या वेळात पुढे जाऊ दिले. पण पुन्हा सूर्यमुखी दरवाजावर अडवण्यात आले. मंदिरात असलेल्या कर अधिकारी दिनेश जयस्वाल यांना याबाबत विचारल्यानंतर ते वाद घालू लागले. 

यादरम्यान पुजाऱ्यांनी सभा मंडपात कैलाश विजयवर्गीय, त्यांचा मुलगा आकाश आणि आमदार मेंदोला यांना पाहिले. या प्रकारामुळे पुजाऱ्यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची तंबी दिली. या घटनेवर बोलण्यास मंदिर प्रशासन तयार नाही. सध्या पुजाऱ्यांशिवाय कुणालाही गाभाऱ्यात जाण्यासाठी परवानगी नाही. विजवर्गीय यांना तुमच्यामुळं पुजाऱ्यांनाही रोखलं जात आहे, असं विचारल्यानंतर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तसेच आमदार मेंदोला यांनी तोंड झाकून घेतलं. 

असे असतानाही या नेत्यांना कुणाच्या आदेशावरून तिथे जाऊ दिले, याची चौकशी करावी, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे. मागील वर्षभरापासून कोरोना प्रोटोकॉलमुळे व्हीआयपींसह भाविकांना भस्म आरतीवेळी प्रवेश दिला जात नाही. मंदिरातून बाहेर पडताना विजयवर्गीय यांना पत्रकारांनी गाठत याबाबत विचारणा केली. पण त्यांनी त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. पुजाऱ्यांकडून याबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com