सार्वजनिक जीवनात येडियुरप्पा 2009 नंतर थेट 2021 मध्येच रडले!

कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची घोषणा करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
karnataka ex chief minister yediyurappa cried publicly after 2009
karnataka ex chief minister yediyurappa cried publicly after 2009

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) हे  पायउतार झाले आहेत. येडियुरप्पांनी काल (ता.26) सरकारच्या द्विपक्षपूर्ती कार्यक्रमात राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी निरोपाच्या भाषणात त्यांना अनेक वेळा अश्रू अनावर झाले. याआधी 2009 मध्ये येडियुरप्पा सार्वजनिक जीवनात जाहीरपणे रडताना दिसले होते. आता सुमारे 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा येडियुरप्पा जाहीरपणे रडताना दिसले. 

येडियुरप्पा याआधी 2009 मध्ये जाहीरपणे रडताना दिसले होते. रेड्डी बंधूंच्या राजकीय दबावामुळे येडियुरप्पांना 2009 मध्ये ते मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळातून शोभा करंदालजे यांना वगळावे लागले होते. तिन्ही रेड्डी बंधूंनी त्यावेळी येडियुरप्पा आणि भाजप सरकारला अडचणीत आणले होते. करंदालजे या येडियुरप्पांच्या निकटवर्तीय सहकारी होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री येडियुरप्पा जाहीरपणे रडताना दिसले होते. करंदालजे या आता केंद्रीय राज्यमंत्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे सध्या कृषी व शेतकरी कल्याण खात्याच्या कार्यभार आहे.  

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेतृत्वाने पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी नेमले आहे. दोघेही केंद्रीय निरीक्षक बंगळूरमध्ये दाखल झाले आहे. बंगळूरमध्ये आज सायंकाळी भाजपच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल.  

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी येडियुरप्पांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत येडियुरप्पा राज्याची धुरा सांभाळतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com