राजीनाम्यानंतर तरुण समर्थकाने आत्महत्या केली अन् येडियुरप्पा म्हणाले...

कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे.
after resignation of yediyurappa supporter committed suicide
after resignation of yediyurappa supporter committed suicide

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. येडियुरप्पांच्या एका तरुण समर्थकाने यामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर झाला आहे. याबाबत येडियुरप्पांनी अतीव दु:ख व्यक्त केले आहे. 

येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांच्या समर्थकाने आत्महत्या केली आहे. राजप्पा (रवि) या 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. तो चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलूपेट तालुक्यातील बोम्मलपुरा येथील रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येनंतर येडियुरप्पांनी अतीव दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या घटनेमुळे मी अतिशय दु:खात आहे. राजकारणात चढउतार हे नेहमीच असतात. यासाठी आपले आयुष्य संपवणे हे अजिबात स्वीकारार्ह नाही. कुणीही अशा प्रकारचे पाऊल उचलू नये. 
  

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेतृत्वाने पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी नेमले आहे. रेड्डी हे बंगळूरमध्ये दाखल झाले आहे. बंगळूरमध्ये आज सायंकाळी भाजपच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल.  

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी येडियुरप्पांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत येडियुरप्पा राज्याची धुरा सांभाळतील. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com