गुड न्यूज : कोरोना लसीकरण झालंय मग बाहेर जाताना मास्क घालण्याची गरज नाही - fully vaccinated people do not need to wear mask outside in US | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : कोरोना लसीकरण झालंय मग बाहेर जाताना मास्क घालण्याची गरज नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 28 एप्रिल 2021

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून, अनेक देशांत मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. 

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरू अनेक देशांत मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, आता अमेरिकेत नागरिकांना बाहेर जाताना मास्क घालण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र, यासाठी कोरोनाचे पूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल. अमेरिका सरकारने नव्या नियमावलीला मंजुरी दिली आहे. 

याविषयी अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने घोषणा केली आहे. संस्थेने म्हटले आहे की, कोरोनाचे पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना यापुढे बाहेर जाताना मास्क घालण्याची आवश्यकता नाही. ते एकटे बाहेर पडणार असतील अथवा लस घेतलेल्या छोट्या समूहांत जाणार असतील, त्यांनी मास्क घालू नये. मात्र, ते गर्दीच्या ठिकाणी जाणार असतील तर त्यांनी मास्क वापरावा. आतापर्यंत अमेरिकेतील 9.5 कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. 

हेही वाचा : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अन् मृत्यू महाराष्ट्रातच 

व्हाईट हाऊसच्या कोरोनाविषयक टास्क फोर्ससमोर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीडीसीची नवीन नियमावली मांडली आहे. या नियमावलीनुसार, छोटी किंवा मध्यम गर्दी असलेले कार्यक्रम लोक आता बाहेर आयोजित करु शकतात. फक्त यासाठी सर्वांना कोरोनाचे लसीकरण पूर्ण केलेले असायला हवे. हे कार्यक्रम आयोजित करताना त्यांना मास्क घालण्याची आवश्यकता असणार नाही. पूर्ण लसीकरण म्हणजे शेवटचा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी असणार आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अतिशय कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  

हेही वाचा : भारतात आतापर्यंत कोरोनाने घेतले दोन लाख बळी 

भारतात 24 तासांत 3 लाख 60 हजार रुग्ण 
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 60 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 293 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक 895 मृत्यू एकट्या महाराष्ट्र राज्यात नोंदवण्यात आले आहेत.  देशात सक्रिय रुग्णांची संख्या आता 29 लाखांवर पोचली असून, यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 6 लाख 70 हजार 358 रुग्ण आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख