सावधान : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अन् मृत्यूही महाराष्ट्रातच - maharashtra records highest deaths and active covid 19 cases | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

सावधान : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अन् मृत्यूही महाराष्ट्रातच

वृत्तसंस्था
बुधवार, 28 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत देशभरात तब्बल 3 हजार 293 जणांचा मृत्यू  झाला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 60 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 293 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक 895 मृत्यू एकट्या महाराष्ट्र राज्यात नोंदवण्यात आले आहेत.  देशात सक्रिय रुग्णांची संख्या आता 29 लाखांवर पोचली असून, यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 6 लाख 70 हजार 358 रुग्ण आहेत. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 79 लाख 97 हजार 267 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 1 हजार 187 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 60 हजार 960 रुग्ण सापडले असून, 3 हजार 293 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

मागील 24 तासांत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 895 एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. म्हणजेच सुमारे 25 टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल दिल्लीत 381 मृत्यू झाले आहेत. उत्तर प्रदेश 264, छत्तीसगड 246, कर्नाटक 180, गुजरात 170, झारखंड 131, राजस्तान 121, पंजाब 100 आणि मध्य प्रदेश 98 मृत्यू झाले आहेत. 

हेही वाचा : स्मशाने पडू लागली कमी; देशात कोरोनाचे दोन लाख बळी 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 29 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांपैकी 72 टक्के केवळ 9 राज्यांतील आहेत. यातील सुमारे 25 टक्के महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक 6 लाख 70 आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 3 लाख 5 हजार, कर्नाटक 3 लाख 1 हजार, केरळ 2 लाख 47 हजार, राजस्थान 1 लाख 55, गुजरात 1 लाख 27 हजार, छत्तीसगड 1 लाख 19 हजार, तमिळनाडू 1 लाख 8 हजार आणि पश्चिम बंगाल 1 लाख अशी संख्या आहे. 

सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 29 लाख 78 हजार 709 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.55 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.33 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 48 लाख 17 हजार 371 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

Edited by Sanjay 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख