स्मशानेही पडू लागली कमी...देशात आतापर्यंत कोरोनाने घेतला 2 लाखांहून अधिक जणांचा बळी - in last 24 hours india reported more than 3 thousand covid deaths | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

स्मशानेही पडू लागली कमी...देशात आतापर्यंत कोरोनाने घेतला 2 लाखांहून अधिक जणांचा बळी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत तब्बल 3 लाख 60 हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 60 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 293 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूंची संख्या वाढल्याने स्मशानभूमी अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 2 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.  

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 79 लाख 97 हजार 267 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 1 हजार 187 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 60 हजार 960 रुग्ण सापडले असून, 3 हजार 293 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 29 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 29 लाख 78 हजार 709 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.55 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.33 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 48 लाख 17 हजार 371 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 28 कोटी 27 लाख 3 हजार 789 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल (ता.27) 17 लाख 23 हजार 912 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख