रियाची चौकशी दहा तासांनंतरही अपूर्णच; पुन्हा होणार चौकशी

सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक दावे केले जात आहेत. रिया चक्रवर्ती हिची सीबीआयने आज मॅरेथॉन चौकशी केली.
cbi questions actress rhea chakraborty for more than ten hours
cbi questions actress rhea chakraborty for more than ten hours

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआयने आज चौकशी केली. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून रियाची सुरू झालेली चौकशी अखेर नऊ वाजता संपली. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली होती. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. सिद्धार्थ आणि नीरज या दोघांची सीबीआयने आधी चौकशी केली आहे. याचबरोबर सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांचीही चौकशी करण्यात आली. सुशांतकडे घरकाम करणाऱ्या दीपेश सावंत यांचीही चौकशी सीबीआयने केली होती. काल सीबीआयने रियाचा भाऊ शोविक याची आठ तास चौकशी करुन त्याचा जबाब  नोंदवला होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती हिची आज सीबीआयने चौकशी सुरू केली. सकाळी 10.30 वाजता चौकशीसाठी आलेली रिया रात्री नऊ वाजता तेथून बाहेर पडली. याचबरोबर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा यांचीही चौकशी करण्यात आली. 

काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रिया हिला सीबीआयने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. रिया ही सुशांतच्या घरातून 8 जूनला बाहेर पडली होती. सुशांतशी संबंध तोडण्याचे कारण स्पष्टपणे सांगू शकली नाही. यामुळे पुन्हा एकदा तिची चौकशी करण्यात येत आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com