सीबीआयकडून रियाची सिद्धार्थ पिठाणी, सॅम्युएल मिरांडा यांच्यासमोरच चौकशी

सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक दावे केले जात आहेत. सीबीआयने आता रिया चक्रवर्ती हिची चौकशी सुरू केली आहे.
cbi questioning rhea chkraborty, siddarth pithani and samual miranda
cbi questioning rhea chkraborty, siddarth pithani and samual miranda

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. आता सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून रियाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली होती. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. सिद्धार्थ आणि नीरज या दोघांची सीबीआयने आधी चौकशी केली आहे. याचबरोबर सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांचीही चौकशी करण्यात आली. सुशांतकडे घरकाम करणाऱ्या दीपेश सावंत यांचीही चौकशी सीबीआयने केली होती. काल सीबीआयने रियाचा भाऊ शोविक याची आठ तास चौकशी करुन त्याचा जबाब  नोंदवला होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती हिची आज सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा यांनाही चौकशीसाठी सीबीआयने बोलावले होते. ते ही चौकशीसाठी हजर झाले आहेत. सिद्धार्थ आणि सॅम्युएल यांच्यासमोरच रियाची चौकशी सीबीआय करीत आहेत. या तिघांची एकत्रित चौकशी करुन सीबीआय त्यांच्या जबाबातील विसंगती शोधत आहे. या तिघांपैकी कोणी खोटी माहिती देत असल्यास त्याची तातडीने खातरजमा करण्यासाठी तिघांची एकत्रित चौकशी सुरू आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com