मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या 'ग्लोबल' शुभेच्छा!

राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Barry O Farrell gives birthday wishes to CM Uddhav Thackeray
Barry O Farrell gives birthday wishes to CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. बहुतेक नेत्यांनी ट्विट करूनच त्यांचे अभिष्टचिंतन केलं आहे. पण यातील एक ट्विट सध्या व्हायरल झालं आहे ते ऑस्ट्रेलियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे. (Barry O Farrell gives birthday wishes to CM Uddhav Thackeray)

ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांनी या शुभेच्छा थेट मराठीत दिल्याने हे त्यांचे हे ट्विट व्हायरल झालं आहे. हे ट्विट त्यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टॅग केलं आहे. या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

एका सर्वेक्षणामध्ये देशात ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करण्यास समर्थ असल्याचे वक्तव्य केलं होतं. आता ठाकरे यांना जागतिक पातळीवरूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळू लागल्या आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्याबद्दल अनेकांनी फॅरेल यांचे आभार मानले आहेत. तसेच मराठीचा द्वेष करणाऱ्यांचे काहींनी कानही टोचले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती तसेच मागील आठवड्यात अनेक भागात निर्माण झालेली पुरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. 

केवळ सोशल मीडिया किंवा ई-मेलद्वारे शुभेच्छा देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांतील अनेक नेत्यांनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या ट्विटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com