Mumbai court warns Kangana Ranawat with arrest warrant
Mumbai court warns Kangana Ranawat with arrest warrant

कंगना हाजिर हो! आता शेवटची संधी...अन्यथा अटक वॉरंट काढणार! 

मुंबईतील अंधेरी येथील महानगर न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत सध्या वेगवेगळ्या खटल्यांमुळे चर्चेत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरूध्द मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण या प्रकरणाच्या सुनावणीला कंगना एकदाही न्यायालयात हजर झाली नाही. यावरून न्यायालयाने मंगळवारी तिच्यावर ताशेरे ओढत न्यायालयात हजर राहण्याची शेवटची संधी दिली. (Mumbai court warns Kangana Ranawat with arrest warrant)

पुढील तारखेला न्यायालयात हजर न झाल्यास कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. मुंबईतील अंधेरी येथील महानगर न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी सुनावणी सुरू झाल्यानंतर कंगनाच्या वकिलांनी ती देशात नसल्याने सुनावणीला येणार नाही. त्यामुळं इथे उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी केली. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यावर आक्षेप घेतला. 

कंगना एकाही तारखेला हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याची मागणीही भारद्वाज यांनी केली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आर. आर. खान यांनी कंगनाला आजच्या दिवसापुरते हजर न राहण्याची सवलत दिली. पण पुढील तारखेला त्या हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट काढले जाईल, असेही न्यायालयानं स्पष्ट केलं.

काय आहे प्रकरण?

अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद यांनी केला होता.

कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलिस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी न्यायालयात दिली होती. या प्रकरणात कंगना एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com