मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली; गोळीबार सुरू असताना सहावेळा फोन केला...ते म्हणाले, सॉरी!

मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला दोन्ही राज्यांमधील वाद आता आणखी वाढला आहे.
No one can take even an inch of our land says Himanta Biswa Sarma
No one can take even an inch of our land says Himanta Biswa Sarma

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस (Police) दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला दोन्ही राज्यांमधील वाद आता आणखी वाढला आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांत भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. पण दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्रीच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. (No one can take even an inch of our land says Himanta Biswa Sarma)

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्यावर थेट आरोप केला आहे. गोळीबार सुरू असताना त्यांना सहावेळा फोन केला. पण ते केवळ 'सॉरी' म्हणाले आणि मला चर्चेसाठी ऐजवाल येथे बोलावले, असा दावा सरमा यांनी केला आहे. आमची एक इंच जमीनही कोणी घेऊ शकणार नाही. आम्ही आमचा भूभाग सुरक्षित ठेवू, असा इशाराही सरमा यांनी दिला आहे. 

हा राजकीय मुद्दा नसून दोन्ही राज्यांतील सीमावाद आहे. दोन्ही राज्यांत काँग्रेसची सत्ता असतानाही हा वाद होता. काल झालेल्या गोळीबाराची पोलिसांकडून चौकशी केली जाईल. नागरिकांना हत्यारे कशी मिळाली, याचा शोध घेतला जाईल, असंही सरमा यांनी स्पष्ट केलं. झोरामथांगा यांनीही काल ट्विटरवरून आसामच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या वादात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलं होतं. 

दरम्यान, केंद्र सकारने दोन्ही राज्यांच्या सीमेवर केंद्रीय सशस्त्र राखीव दलाच्या (CRPF) तुकड्या तैनात केल्या आहेत. आता तेथील परिस्थिती नियंत्रात असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. असे असले तरी आसामचे मुख्यमंत्री आणि मिझोरामचे गृहमंत्री सीमाभागाला आज भेट देणार आहेत. 

आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे आज सीमाभागाला भेट देणार आहेत. तसेच, मिझोरामचे गृहमंत्री लालचामलिना हेसुद्धा सीमाभागाला भेट देणार आहेत. यामुळे पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com