लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
Government would likely start vaccinating children next month for COVID19
Government would likely start vaccinating children next month for COVID19

नवी दिल्ली : देशात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू असताना आता लहान मुलांनाचे लसीकरणही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांनी याबाबतची माहिती भाजप खासदारांच्या बैठकीत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित होते. (Government would likely start vaccinating children next month for COVID19)

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग फारसा झाला नाही. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये सज्ज ठेवली जात आहे. तसेच काही कंपन्यांकडून लहान मुलांवर लशींच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. काही देशांमध्ये यापूर्वीच लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता देण्यात आली आहे.

भारतात ऑगस्ट महिन्यात लहान मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते, असे मांडविया यांनी बैठकीत स्पष्ट केलं आहे. संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने लहान मुलांचे लसीकरण महत्वाचे ठरणार आहे. तसेच लवकरात लवकर शाळा सुरू होण्यासाठीही हे पाऊल आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सप्टेंबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल, असे सांगितले होते. 

लहान मुलांमध्ये प्रामुख्याने 12 ते 18 वयोगटातील मुलांचा समावेश असेल. झायडस कंपनीच्या लशीने लसीकरणाला सुरूवात होईल, असेही अरोरा यांनी स्पष्ट केलं होतं. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लशीच्या मुलांवर चाचण्या सुरू आहेत. कोव्हॅक्सिनचे निष्कर्ष सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता असल्याचे एम्सचे प्रमुख डॉ. रणजीप गुलेरिया यांनी सांगितले होते. त्यांनीही सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त सांगितला होता. 

दरम्यान, भारतात आतापर्यंत 44 कोटी डोस देण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक कोटींहून अधिक झाली आहे. देशात महाराष्ट्र हे उद्दिष्ट गाठणारं पहिलंच राज्य ठरलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com