मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा अखेर झुकले; खासदारावरील गुन्हा मागे

आसाम व मिझोराम सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. यामुळे दोन्ही राज्यांतील वाद चिघळला आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा अखेर झुकले; खासदारावरील गुन्हा मागे
assam chief minister himanta biswa withdraws fir against mp vanlalvena

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचारात आसाम पोलीस (Assam Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारामागे भाजपच्या सहकारी पक्षाचे मिझोराममधील खासदार के.वानलालवेना (K. Vanlalvena) यांचा हात असल्याचे समोर आले होते. त्यांच्याविरोधात आसामने गुन्हाही दाखल केला होता. आता हा गुन्हा मागे घेत असल्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे की, ईशान्य भारतातील एकता आसामला कायम ठेवायची आहे. त्यामुळे मैत्रीचे पाऊल उचलत आसाम सरकार मिझो नॅशनल फ्रंटचे खासदार वानलालवेवा यांच्यावरील गुन्हा मागे घेत आहे. परंतु, इतर पोलीस अधिकाऱ्यांवरील गुन्हा कायम राहील. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी सीमावाद चर्चेने सोडवण्याची तयारी दाखवल्याचे मी माध्यमांमधून पाहिले आहे. याचे आम्ही स्वागत करतो. सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी आसाम सरकार कटिबद्ध आहे. 

मिझोराममधील खासदार के.वानलालवेना यांच्या विरोधात आसाम पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. ते सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटचे खासदार असून, हा पक्ष भाजपचा सहकारी पक्ष आहे. आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. या हिंसाचारानंतर खासदार वानलालवेना यांनी आसाम पोलिसांनी जाहीर धमकी दिली होती. 

मिझोराममधील राज्यसभा खासदार के. वानलालवेना यांनी प्रसारमाध्यांना मुलाखत दिली होती. यातून त्यांचा या हिंसाचारातील सक्रिय सहभाग समोर आला आहे. या हिंसाचारामागील कटाचा उलगडा झाला असून, हा कट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आमच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दिल्लीत दाखल झाले आहे. आसाम पोलिसांवर गोळीबार करणाऱ्यांची छायाचित्रे जमा करण्यात आली आहेत. मिझोरामचे पोलीस कर्मचारी आणि काही नागरिकांचा यात समावेश आहे. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांना आसाम पोलिसांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती आसाम पोलिसांनी दिली होती. 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.