Papua New Guinea: पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देणारा 'पापुआ न्यु गिनी' देश आहे तरी कुठे?

International News| पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी भारतीय पंरपंरेप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे स्वागत केले.
Papua New Guinea:
Papua New Guinea:Sarkarnama

Papua New Guinea: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२१ मे) संध्याकाळी जपाननंतर पापुआ न्यू गिनी च्या दौऱ्यावर गेले होते. याठिकाणी FIPIC समिटमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा हा दौरा होता. याठिकाणी घडलेला प्रसंग हा भारतीयांसाठी अभिमानाचाच म्हणावा लागेल. कारण यजमान देशाने पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्याची परंपरा मोडली. कारण विमानतळावर उतरताच पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी भारतीय पंरपंरेप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताचे फोटो संपुर्ण जगभरात फिरत होते. (Where is Papua New Guinea, the country that gave the highest civilian award to Prime Minister Narendra Modi?)

Papua New Guinea:
Joe Biden Murder Plan: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हत्येचा प्रयत्न; भारतीय वंशाच्या तरुणाने रचला कट

हे झालं भारतीय परंपरेचं पण नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या या दौऱ्यामुळे भारतीयांना पहिल्यांदाच पापुआ न्यु गिनी या देशाची ओळख झाली. पण तुम्हाला माहिती आहे का, की हा पापुआ न्यु गिनी देश आहे तरी कुठे?

इंडोनेशियाजवळील एक स्वतंत्र राष्ट्र

पापुआ न्यू गिनी हे इंडोनेशियाजवळील प्रशांत महासागरातील एक स्वतंत्र राष्ट्र आहे. नैऋत्य प्रशांत महासागर क्षेत्रातील बेटांच्या समूहातील एक छोटेसे बेट म्हणजे पापुआ न्यू गिनी. ये पोर्ट मोरेस्बी ही पापुआ न्यु गिनीची राजधानी आहे. पापुआ न्यु गिनीची विशेष बाब म्हणजे हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये 22 प्रांत (राज्य) आहेत. (Papua New Guinea)

Papua New Guinea:
UPSC Result : 'यूपीएससी'त मुलींच्या यशाची गुढी उंच; 'टॉप फोर'मध्ये मारली बाजी !

लोकसंख्या, भाषा आणि धर्म

पापुआ न्यु गिनीची लोकसंख्या जवळपास 99.5 लाखांच्या आसपास असून विविधतेचा देश म्हणूनही ओळखला जातो. 60 लाखांची लोकसंख्या असलेल्या या देशात सुमारे 850 भाषा बोलल्या जातात आणि अनेक धार्मिक समुदाय येथे राहतात. येथील केवळ १८ टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. या ठिकाणी इंग्रजी आणि टोक पिसिन या भाषा बोलल्या जातात. पापुआ गिनीचे लोक ईसाई धर्माचे आहेत.

स्वातंत्र्य

पापुआ न्यु गिनी हा देश 1 डिसेंबर 1975 रोजी ऑस्ट्रेलियापासून स्वतंत्र झाला. न्यु गिनीच्या स्वातंत्र्यावेळी 1975 मध्ये याठिकाणी केवळ रे 50,000 ऑस्ट्रेलियन होते. यातले कदाचित 10,000 चीनी वंशाचे लोक ज्यांचे पूर्वज पहिल्या महायुद्धापूर्वी स्थलांतरित झाले होते. यातील बहुतेक लोक 21 व्या शतकाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले होते. (Internationa News)

Papua New Guinea:
New Parliament : नव्या संसद भवन उद्घाटनावरून राजकीय नाट्य सुरूच; चार पक्षांचा बहिष्कार?

प्रमुख व्यवसाय

कृषी उत्पादन, त्यातील बहुतांश निर्वाह शेतीतून, देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे एक तृतीयांश वाटा आहे. उत्तरेकडील आणि ईशान्येकडील बेटांमध्ये, यम, तारो आणि केळी मुख्य अन्नपदार्थांचे उत्पादन होते. ते पूर्वी डोंगराळ प्रदेशातील लोकांसाठी मुख्य अन्न असणारे रताळ्याचेही उत्पादन केले जाते. न्य गिनीत रताळ्याला गाय या नावाने ओळखले जाते.

चलन

पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही महिन्यांपूर्वी 'किना' हे देशाचे चलन आहे. मध्यवर्ती बँक पापुआ न्यू गिनी बँक आहे. स्वातंत्र्यानंतर किनाचे मूल्य खूप वाढले, परंतु 1989 मध्ये बोगेनव्हिलमधील अलिप्ततेचे संकट आणि खराब वित्तीय नियंत्रणांमुळे 1990 च्या दशकात मोठे अवमूल्यन झाले.

Papua New Guinea:
PM Modi in Australia : नरेंद्र मोदी आहेत 'बॉस' ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी उधळली स्तुतिसुमने...

व्यापार

पापुआ न्यू गिनीमध्ये सामान्यतः व्यापाराचा समतोल सकारात्मक आहे. 2005 पासून परकीय गंगाजळी वाढली आहे. न्यु गिनी सोने आणि तांबे या धातुंची प्रामुख्याने निर्यात करतो. निर्यातीची प्रमुख ठिकाणे, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन ही आहेत.

सरकार

पापुआ न्यू गिनीची राज्यघटना 1975 मध्ये स्वीकारण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यात अनेक वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. देश एक घटनात्मक राजेशाही आहे आणि राष्ट्रकुल राष्ट्रांचा सदस्य आहे. ब्रिटीश सम्राट, गव्हर्नर-जनरलद्वारे प्रतिनिधित्व केले जाते, जे राज्याचे प्रमुख असतात आणि पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. एकसदनी राष्ट्रीय संसदेत 111 सदस्य आहेत जे पाच वर्षांसाठी निवडले जातात.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com