Anuradha Dhawade
२०१९ साली जेम्स मारापे हे पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान पदी विराजमान झाले.
जेम्स मारापे हे पापुआ न्यू गिनी'चे आठवे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान होण्यापुर्वी त्यांनी आधीच्या सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
१९९३ साली मारापे यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पापुआ न्यू गिनीमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी पर्यावरणशास्त्र आणि एमबीए'ची पदवी प्राप्त केली.
पांगू पती या पक्षाकडून निवडणूक लढवण्यापूर्वी जेम्स मारापे २०१९ पर्यंत पापुआतील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते.
जेम्स मारापे यांनी 2019 मध्ये पीपल्स नॅशनल पार्टीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पांगू पक्षात प्रवेश केला.
पंतप्रधान होण्याआधी जेम्स मारापे यांनी आधीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक विभाग, या विभागांची जबाबदारी पार पाडली आहे.
पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्तानंतर कोणत्याही पाहुण्याचं स्वागत केलं जात नाही. पण पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जेम्स मारापे स्वत: विमानतळावर उपस्थित होते.
जेम्स मारापे ५२ वर्षांचे आहेत. एका अहवालानुसार, पीएम मोदी यांच्या शिवाय आजपर्यंत त्यांनी कोणत्याही नेत्याच्या पायांना स्पर्श केलेला नाही.