Jow Biden on PM Narendra Modi: मोदींच्या लोकप्रियतेने जो बायडेन'ही भारावले..; म्हणाले, मला तुमचा ऑटोग्राफ द्या..

PM Narendra Modi News : 'मॉर्निंग कन्सल्ट'ने केलेल्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत.
PM Narendra Modi News :
PM Narendra Modi News : Sarkarnama

US President Joe Biden to PM Narendra Modi to greet him : पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही.पण आता जगातील बड्या देशांच्या प्रमुखांनाही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेची खात्री पटली आहे. 'मॉर्निंग कन्सल्ट'ने केलेल्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. २२ देशांच्या नेत्यांना मागे टाकत या यादीत पंतप्रधान मोदींनी पहिले स्थान मिळवले आहे.

पीएम मोदींना 78 टक्के ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे, त्यांची ही लोकप्रियता पाहून जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेदेखील भारावून गेल्याचं पाहायला मिळालं.

त्यांच झालं काय, भारतासह जगभरातील महत्त्वाच्या देशांचे राष्ट्रप्रमुख क्वाड परिषदेसाठी जपानमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी या सर्व राष्ट्रप्रमुखांची एक मिटींग पार पडली. या मीटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वत: पंतप्रधान मोदींकडे आले आणि त्यांची गळाभेट घेतली. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता पाहून भारावलेल्या बायडेन य़ांनी सर्वात आधी त्यांना अलिंगन दिले. त्याचवेळी त्यांच्याकडे थेट ऑटोग्राफच मागितला.

जो बायडन मोदींना म्हणाले की, “मी सध्या एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करत आहे. तुमची अफाट लोकप्रियता माझ्यासाठी एक समस्या बनली आहे. अमेरिकेतील लोकांवरही प्रभाव टाकला आहे. अमेरिकेतील जनतेतही तुमची प्रचंड लोकप्रियता आहे. तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या.'' आता या भेटीची संपुर्ण देशभरात चर्चा सुरु झाली आहे.

क्वाड बैठकीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचे कौतुक केले. ते म्हणाले की सिडनीमधील सामुदायिक रिसेप्शनची क्षमता 20,000 लोकांची आहे परंतु तरीही कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज येत आहेत. आपल्या भारत भेटीदरम्यानही नरेंद्र मोदी स्टेडियमवर 90 हजारहून अधिक लोकांनी त्यांचे स्वागत केले होते. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मार्चमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याला हजेरी लावली होती.सोमवारी पंतप्रधान मोदी जपानहून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com