प्लीज, मॅडम मला इथून घेऊन चला ; भाजप खासदाराच्या सुनेची राष्ट्रवादीकडे विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत
Sarkarnama (73).jpg
Sarkarnama (73).jpg

मुंबई :  वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (ramdas tadas) यांच्या सुनेनं तडस कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाकडून मारहाण व अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी हा व्हिडिओ टि्वट केला आहे. तडस यांच्या सुनंने आपल्याकडे मदतीची विनंती केली असल्याचे चाकणकर यांनी म्हटलं आहे. 

पूजा तडस यांचा हा व्हिडीओ रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी टि्वट केला आहे. यात ''मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला धोका आहे इथे, प्लीज मॅडम मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते, असे त्या म्हणत आहे.  ''राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत,'' अशी माहिती चाकणकर यांनी टि्वट करुन दिली आहे.  

रुपाली चाकणकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, वर्धा भाजप खासदार रामदास तडस कुटुंब हे त्यांच्या सुनेला मारहाण करुन अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे. तातडीने पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहोचले आहेत. 

धक्कादायक : परमबिर सिंह यांनी दिली सायबर तज्ज्ञाला ५ लाखाची लाच  
मुंबई : अँटिलिया घटनेनंतर समोर आलेल्या जैश-उल-हिंदच्या षडयंत्रात   माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह याचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना अगदी सुरुवातीपासूनच होता. मात्र एनआयएने आपल्या आरोपपत्रात परमबीर सिंगच्या भूमिकेबद्दल काहीही लिहिले नसले तरी, सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाब मध्ये परमबीरचे नाव घेतले आहे. त्याने परमबीरच्या सांगण्यावरून अहवालात काही बदल केले आहेत. जानेवारी 2021 मध्ये दिल्लीतील इस्रायल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बनवण्यात आला होता. त्यावेळीही जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेने ही जबाबदारी  टेलिग्रामवर स्विकारली आणि त्यानंतर सायबर तज्ज्ञांनी अहवाल तयार केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com