धक्कादायक : परमबीर सिंह यांनी दिली सायबर तज्ज्ञाला ५ लाखाची लाच  

अँटिलिया घटनेनंतर 'जैश-उल-हिंद' या अतिरेकी संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्वीकारली , असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते.
Parambir Singh.jpg
Parambir Singh.jpg

मुंबई : अँटिलिया घटनेनंतर समोर आलेल्या जैश-उल-हिंदच्या षडयंत्रात   माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह याचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना अगदी सुरुवातीपासूनच होता. मात्र एनआयएने आपल्या आरोपपत्रात परमबीर सिंगच्या भूमिकेबद्दल काहीही लिहिले नसले तरी, सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाब मध्ये परमबीरचे नाव घेतले आहे.त्याने परमबीरच्या सांगण्यावरून अहवालात काही बदल केले आहेत.

जानेवारी 2021 मध्ये दिल्लीतील इस्रायल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बनवण्यात आला होता. त्यावेळीही जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेने ही जबाबदारी  टेलिग्रामवर स्विकारली आणि त्यानंतर सायबर तज्ज्ञांनी अहवाल तयार केला होता.

अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात एका सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे.  त्याने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया घटनेच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड केली होती. यासाठी, परमबीरने त्या सायबर तज्ज्ञाला 5 लाख रुपये रोख दिले होते.

सायबर तज्ज्ञाने एनआयएला दिलेल्या आपल्या जबाबात मोठा खुलासा केला आहे.  त्यामुळेच एनआयएने त्याचाही जबाब आरोपपत्रात नोंदवलेला आहे. ज्यामध्ये सायबर तज्ज्ञाने सांगितले की, अँटिलिया घटनेनंतर 'जैश-उल-हिंद' या अतिरेकी संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्वीकारली. असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला.

एनआयएने 5 ऑगस्ट रोजी या सायबर तज्ज्ञाचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले होते, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, तो भारतातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना सायबरशी संबंधित प्रशिक्षण देतो, अनेक गुप्तचर संस्थांसोबत काम ही करतो, त्यानुसार 9 मार्च 2021 रोजी तो मुंबई असताना. ट्रेनिंग संदर्भात बातचीत करण्यासाठी परमबिर सिंह यांना त्या़च्या कार्यालयात भेटायला गेला होता.

त्या बैठकीच्या वेळी  परमबीर सिंह यांना सांगितले होते की, 2 फेब्रुवारी रोजी अँटिलिया घटनेची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट "जैश-उल-हिंद" या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड करण्यात आली होती. त्याचा छडा लावण्यात स्पेशल सेल दिल्ली यांना यश आलेलं आहे. ही पोस्ट दिल्लीच्या तिहार जेल परिसरातून करण्यात आली होती असे सांगितले. या घटनेनंतर सायबर तज्ज्ञ म्हणून तोही अशाच एका टेलिग्राम चँनेलला फाँलो करत असल्याचे परमबीर सिंह यांना त्याने सांगितले. त्यानंतर परमबीरने त्या सायबर तज्ज्ञाला असाच अहवाल या प्रकरणासाठी देण्याबाबत गळ घातली. हा अहवाल गोपनीय आहे. हे सांगून सुद्धा परमबीर सिंह यांनी असा अहवाल देण्यासंदर्भात थेट एनआयए आयजीशी बोलणार असल्याचेही सागितले

परमबीर सिंह याच्या आग्रहानंतर सायबर तज्ज्ञाने अँटिलिया स्फोटकाची जबाबदारी घेणारा जैश उल हिंद संघटनेचा अहवाल बनवला. हा अहवाल बनवून परमबीर सिंह यांना दाखवला असता. त्यानी जैश उल हिंदचे पोस्टर ही त्यात जोडण्यास सांगितले.  एनआयएचे आयजी केव्हाही मुंबईत येतील त्यांना हा अहवाल त्यांना दाखवावा लागेल, त्यामुळे सायबर तज्ज्ञावर परमबीर सिंह यानी दबाव टाकला. अहवालात बदल केल्यानंतर सायबर तज्ज्ञांनी अहवालात ते जैश उल हिंद चे पोस्टर जोडून ते परमबीरच्या अधिकृत मेलवर पाठवले.

सायबर तज्ज्ञाला ५ लाख देण्यास सांगितले
या कामानंतर खूश होऊन परमबीर सिंहने सायबर तज्ज्ञाला पैशाची विचारणा केली. खासगी स्वीय सहाय्यकास बोलावले आणि पैशांची आँफर केली. सायबर तज्ज्ञ विरोध करत असतानाही, परमबीरने सुरूवातीला ३ लाख सायबर तज्ज्ञास देण्यास सांगितले.  मात्र स्वीय सहाय्यक केबिन बाहेर पडत असताना, त्याला पून्हा थांबवून सायबर तज्ज्ञाला ५ लाख देण्यास सांगितले. त्यावर सायबर तज्ज्ञाने ऐवढे पैसे जास्त असल्याचे सांगितले असता. परमबीर सिंहने त्याचे काही ऐकले नाही.

दरम्यान एनआएने  सायबर तज्ज्ञाला या रिपोर्ट संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी अहवालात दिलेल्या माहितीनुसार २६ फेब्रूवारीपासून आपण जैशच्या या चँनेलच्या मागे होतात. मात्र धमकीचा मेसेज हा २७ फेब्रुवारीला आलेला आहे.  मग एकदिवस आधीच आपण त्यावर कसे काम करत होतात यावर एनआयएने सायबर तज्ज्ञ अधिकाऱ्याला प्रश्न केला असता. त्यावर सायबर तज्ज्ञाने हे टेलिग्राम अकाऊट फक्त ४ जण फाँलो करत होते.  ते चॅनेल आणि अँटिलिया घोटाळ्यानंतर जबाबदारी घेणारे चॅनेल सारखे नाहीत, दोन्ही वेगळे असल्याचे सांगितले.
 
मुख्य सूत्रधार कोण 
नुकतीच या प्रकरणात एनआयए च्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. आणि याच पुराव्याच्या आधारावर त्यांना सचिन वाजे आणि सुनिल माने या़ची चौकशी करायची होती.  न्यायालयात तशी मागणीच एनआयएनं केली. कारण सचिन वाजेची 28 दिवस कस्टडी एनआयएनं घेतली आहे. 2 दिवस कस्टडी बाकी होती. तर अटकेनंतर सुनील माने 14 दिवस कस्टडीत होता. त्यामुळे त्याची 4 दिवसाची कस्टडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने वाजेच्या तब्येतीच्या  कारणास्तव ती फेटाळून लावली.  एनआयए सूत्राकंडून मिळालेल्या महितीनुसार या संपूर्ण कटा मागे मुख्य सूत्रधाराचे काही पुरावे एनआएच्या हाती लागलेले आहे. त्याची ओळख पटवण्यासाठीच एनआयएला या दोघा़ंची कस्टडी हवी होती. आता या कटा मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार  आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com